Pune crime : "मोक्का" केसमधील एक वर्षांन पसून फरार असलेल्या दोंघा जणांच्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

कोंढव्यातील मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्या व एक जणांच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या गेली एक वर्षांपासून फरार असलेल्या दोंघा जणांच्या गुन्हे शाखा युनिट ५. ने मुसक्या आवळल्या आहेत.
सदरच्या गुन्ह्याबाबत गुन्हे शाखा युनिट ५. च्या पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अक्रम गुलाब पठाण उर्फ खान ( वय.२८. रा.भाग्योदय नगर कोंढवा खुर्द पुणे) त्याच्या अन्यसाथीदारासह कोंढवा भागात आपले गुन्हेगारी वर्चस्व निर्माण करण्यासाठी दहशत निर्माण केली होती.१०. ऑक्टोंबर २०२१. मध्ये. आक्रम पठाण मझहर शेख आझम पंजाबी महंमद पंजाबी या या सर्वांनी मिळून अरबज समीर शेख ( वय २३. रा.कुबा मज्सिद जवळ कोंढवा खुर्द पुणे) याच्यावर चाकूने वार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर.८७६/२०२१ भा.दा.वी.कलम ३०७.३२३.५०४.५०६.१४३.१४७.१४९. व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७.( १) १३५. व क्रिमीनल अमेण्टमेण्ट कायदा कलम ७. व महाराष्ट्र गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ ( १ ) ३ ( २ ) ३ ( ४ ) अन्वये कारवाई करण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून यामधील आजम अख्तर पंजाबी व मोहम्मद सोहेल आजम पंजाबी हे फरार झाले होते.
या दोघांचा शोध गेली एक वर्षांपासून गुन्हे शाखा व स्थानिक पोलीस स्टेशनचे कर्मचारी घेत होते. गुन्हे शाखा युनिट ५. चे अंमलदार यांना एक खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की आरोपी आजम व मोहम्मद हे दोघेजण त्यांच्या नातेवाईकांना भेटण्याकरिता येणार आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पुणे शाखा ५. यांच्या आदेशानुसार संतोष नगर गल्ली नंबर २. ठिकाण वरुन १) मोहंमद आझम अख्तर खान. उर्फ पंजाबी. ( वय.४८. ) २) मोहम्मद सोहेल आझम खान उर्फ पंजाबी. ( वय.२३. रा.दोघे.संतोष नगर कात्रज पुणे) या दोघांच्या मुस्क्या आवळून त्यांना वानवडी पुणे विभाग चे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता.सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर पोलीस अंमलदार राजस शेख पृथ्वीराज पांडुळे प्रमोद टिळेकर प्रताप गायकवाड. विनोद शिवले अकबर शेख दयाराम शेगर महिला पोलिस अंमलदार स्वाती गावडे यांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.