Crimes : धावत्या के.के एक्स्प्रेसच्या इंजिनला भीषण आग

पुणे.दिनांक २.( पोलखोल नामा ऑनलाईन न्यूज टीम) मागच्या काही दिवसांपासून रेल्वे बाबत काही ना काही वाईट घटना घडतच आहेत. कालच बिहार मध्ये एका धावत्या एक्स्प्रेसच्या बोगीला आग लागली होती. आज पून्हा आसाच प्रकार घडला आहे. सोलापूरहून निघालेल्या के.के.एक्स्प्रेसच्या धावत्या इंजिनला भीषण आग लागली. त्या नंतर अग्नीशामक यंत्रना त्वरीत घटना स्थळी दाखल झाल्यानंतर ही आग आटोक्यात आणण्या करीता अग्नीशामक दलाच्या जवानांना दोन तास लागले.इंजीनला आग लागल्या नंतर प्रवास करणारे प्रवासी प्रचंड प्रमाणात घाबरले होते व त्यांच्यात भिती निर्मण झाली होती.पण इंजिनला लागलेली आग विझल्या नंतर त्या सर्वांची काळजी मिटली रेल्वे प्रशासनाकडून आगीत खराब झालेले इंजीन काढून दुसरे इंजीन लावल्या नंतर के.के.एक्स्प्रेस दिल्ली च्या दिशेने मारगस्त झाली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.