Currency Fake Notes : बोगस नोटा बनविणाऱ्या टोळीचा मानखुर्द पोलिसांनी आवळल्या मुसक्या

मुंबईत नकली नोटा ( Currency Fake Notes ) छाप कारखान्याची माहिती मिळताच आज शनिवार १७ सप्टेंबर रोजी मानखुर्द पोलिसांनी सदरच्या छाप कारखान्यावर छापा मारून कारवाई केली असून या कारवाईत पोलिसांनी एकूण ७ लाख १६ हजार १५० रुपयांच्या बनावट नोटा ( Currency Fake Notes ) व छापाई साठी लागणारे अन्य साहित्य असा एकूण ९ लाख १६ हजार १५० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
सदरच्या छाप याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की मुंबई पोलिसांना माहिती मिळाली की मानखुर्द भागात एका ठिकाणी बनावट नोटा ( Currency Fake Notes ) छापण्याचा कारखाना चालू आहे. त्यानंतर पोलिसांनी सदर ठिकाणी व कारखान्यावर छापा मारी करून ९ लाख १६ हजार १५० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. नकली नोटा छापून त्या मार्केटमध्ये चलनात आणण्याकरिता आरोपी रोहित शहा ( वय २२ रा.कांदीवली ) याने मानखुर्द भागात ज्योतिर्लिंग नगर मधील डुक्कर चाळीत एक रूम भाडे तत्त्वावर घेतली होती व तो वरच्या माळ्यावरील घरात शहा येणे बनावट नोटा ( Currency Fake Notes ) छापायचा कारखाना चालू केला होता. तिथे तो ५०, १०० आणि २०० रुपयांच्या भारतीय चलनामधील नोटा सारख्या दिसणाऱ्या हुबेहूब नोटा छापत होता.
या बनावट नोटा छाप कारखान्याची माहिती मिळताच मानखुर्द पोलिसांनी त्या छापखान्यावर धाड टाकून पोलिसांच्या पथकाने मोठ्या प्रमाणात बनवत नोटा व त्या छापायची साहित्य मिळाली. या कारवाईत प्रिंटर. कलर बॉटल. तसेच लॅपटॉप जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून रोहित शहा याला अटक केली असून. याप्रकरणी पुढील तपास मानखुर्द पोलीस करत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.