Crime : वाहतूक शाखेतील त्या मद्यधुंद फौजदाराचे तडकाफडकी निलंबन

पुणे दिनांक २२जुलै ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) वाहतूक शाखेत कार्यरत असणा-या एका सहाय्यक फौजदारांने मद्यधुंद अवस्थेत असतांना वाहन चालकांना शिविगाळ करून दंडाच्या नावाखाली पैशांची मागणी केल्याची घटना घडली होती. या घटनेची गंभीर दखल वाहतूक शाखेचे पोलीस उपयुक्त विजयकुमार मगर यांनी घेउन संबंधित सहाय्यक फौजदाराला निलंबित केलेले आहे.
निलंबित करण्यात आलेल्या सहाय्यक फौजदाराचे नाव प्रेमचंद भानुदास वेदपाठक असे आहे. या महाशयांनी माॅडेल काॅलनी परिसरात वाहतूक नियमन करत असतांना व ऑनड्यूटीवर असतांना यांनी मद्यपान करून वाहन चालकांना अडवून दंडाच्या नावाखाली पैशांची मागणी केली होती. नागरिकांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मोबाईल वर व्हिडिओ चित्रण केले होते.व एका महिलांने या बाबत शिवाजी नगर पुणे वाहतूक विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली होती. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून वाहतूक शाखेचे पोलीस उपयुक्त विजयकुमार मगर यांनी वेदपाठक यांना पोलीस खात्याची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवून त्यांना निलंबित केले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.