३४ याचिकांची सहा गटात होणार विभागणी : आमदार अपात्रते प्रकरणी आज होणार सुनावणी कागदपत्रे जमा करण्याची हेडलाईन्स संपली

पुणे दिनांक २६ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) शिवसेना मधून बाहेर पडलेल्या शिंदे गटात गेलेल्या आमदारांवर अपात्रेचची टांगती तलवार आहे.दरम्यान या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यातील कागदपत्रे आपल्या समोर सादर करा असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले होते.याकरीता २५ ऑक्टोबरची डेडलाईन कालच संपली व आज आमदार अपात्रतेबाबतच्या दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी होणार आहे.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने आमदारांच्या अपात्रत्रतेचे प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपविण्यात आलं आहे.यातील याचिका मधील विषय एकच आहे. त्यामुळे ३४ याचिकांवर एकत्रितपणे सुनावणी घेण्याची मागणी शिवसेना ( उध्वव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून करण्यात आली होती.ही मागणी मान्य करत आमदार अपात्रतेबाबतच्या दाखल याचिकांची सहा गटात विभागणी करुन एकत्र सुनावणी घेण्याची तयारी ही मागील सुनावणीच्या वेळी अध्यक्ष नार्वेकर यांनी दर्शवली आहे.आज २६ ऑक्टोबर रोजी विधानसभा अध्यक्षांपुढे व्होईल. दरम्यान पहिल्या बैठकीत हजर राहिले नव्हते व दुसऱ्या बैठकीत उपस्थित नव्हते.विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत व्हीप मोडला.बहुमत चाचणीच्या वेळी व्हीप विरोधात मतदान शिंदे गटाने बजावलेला व्हीप मोडला व अपक्ष आमदार गट अशी वर्गवारी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.