सतीश काल्यानेच पत्रकार जे.डे.यांच्यावर गोळ्या झाडल्या : पत्रकार जे.डे.हत्याकांड प्ररकणी सतीश काल्याचा जामीन हायकोर्टाने फेटाळला आहे.

पुणे दिनांक १६ नोव्हेंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबई मधील जेष्ठ पत्रकार जे.डे.यांच्या हत्या प्रकरणा तील आरोपी रोही जोसेफ उर्फ सतीश काल्याचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे.काल्या हा मागील १३ वर्षांपासून तो कारागृहात आहे.या आधारावर त्याला जामीन देता येणार नाही.असे न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले आहे.
दरम्यान याप्रकरणी न्यायमूर्ती नितीन सांबरे व न्यायमूर्ती एन.आर. बोरकर यांच्या खंडपीठासमोर काल सुनावणी घेण्यात झाली . मागील अनेक वर्षांपासून काल्या हा तुरुंगा मध्ये आहे.त्याच्या विरुद्ध साक्ष देणारा एकही प्रत्यक्ष साक्षीदार नव्हता.गुन्ह्याच्या वेळी त्याच्याकडून कोणतेही शस्त्र पोलिसांनी जप्त केले नाही.अन्य आरोपीच्या जबाबातून मिळालेले पुरावे ग्राह्य धरत काल्याला अटक झाली आहे. असा दावा त्याचे वकिल शिरीष गुप्ते यांनी बचाव केला आहे.दरम्यान या जामीन अर्जाला सरकारी वकील प्रदीप घरात यांनी जामीनाला विरोध केला.या गुन्ह्यांचा मास्टर माईंड छोटा राजन होता.त्याच्या सांगण्या वरुन पत्रकार जे.डे.यांची हत्या झाली.व या हत्यात काल्याचा सहभाग आहे.त्याला जामीन देऊ नये.अशी मागणी यावेळी विषेश सरकारी वकील घरात यांनी यावेळी केली.दरम्यान यावेळी न्यायालयाने निरीक्षण केले आहे. सतीश काल्यानेच पत्रकार जे.डे.यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत.हत्त्याच्या आधी आरोपी काल्या हा त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होता.या हत्या प्रकरणी काल्याने दोन लाख रुपये घेतले होते.या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेता त्याला जामीन देणे योग्य ठरणार नाही.असे नमूद करत न्यायालयाने जामीन याचिका फेटाळून लावली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.