Fire : पुण्यामधील लुल्ला नगर भागातील हॉटेलला भीषण आग आगीत हॉटेल जळून भस्म खाक

पुण्यामधील कोंडव्यातील लुल्ला नगर चौकातील मार्बल विस्टा बिल्डिंग मधील सातव्या मजल्यावर असणाऱ्या हॉटेलला आज सकाळी आग लागून हॉटेल मध्ये सर्वत्र आगीचे लोळ पसरून सर्वत्र भीषण आशा ज्वाला दिसत होत्या. त्यामुळे यादी टेरेसचे व हॉटेलचे प्रचंड आशे नुकसान झाले व आगीत हे हॉटेल भस्म खाक झाले आहे.
दरम्यान सदर घटनेबाबत अग्निशामक दलाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार. मंगळवारी सकाळी त्यांना कोंढवा भागातील लुला नगर मधून कॉल आला होता की एका हॉटेलला प्रचंड आग लागली आहे सदर कॉल नंतर अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळावर पोहोचवून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. सदर हॉटेल ला कशी लागली हे मात्र कळू शकले नाही. पण शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची प्राथमिक अंदाज असल्याची माहिती समोर येत आहे. या बिल्डिंगच्या सातव्या मजल्यावर वरून धूर येत असल्याचे प्रत्यक्ष दर्शनीला दिसले परंतु काही क्षणाच्या आत या ठिकाणी सर्वत्र मोठ-मोठे आगीचे लोळ दिसून आले व आज सर्वत्र पसरली.
दरम्यान मार्बल विस्टा बिल्डिंग वरील सातव्या मजल्यावरील हॉटेलला आग लागलेल्या बिल्डिंगमध्ये अनेक दुकाने व कमर्शियल ऑफिस व ज्वेलरीचे दुकाने आहेत. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न केले आधीची नोट असल्यामुळे हॉटेलमध्ये प्रवेश करण्यास व हॉटेल सातव्या मजल्यावर असल्यामुळे जवानांना प्रवेश करण्यास प्रचंड असा अडथळा येत होता. हॉटेलमधील सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे यातच पुन्हा एकदा आगीचा प्रचंड असा भडका उडाला. सदरच्या हॉटेलला रूप तोप टेरेसवर हॉटेलला सातव्या मजल्यावर असल्यामुळे पुणे महानगरपालिका ची परवानगी नव्हती? खात्रीलायक माहिती आहे. यामध्ये कोणत्या महानगरपालिका अधिकाऱ्याचे व वाढ स्तरीय कर्मचारी यांचे " हात ओले झाले" कोणत्या अधिकाऱ्याला फुकट मध्ये बिर्याणी मिळत होती. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पुणे महानगरपालिका आयुक्त करणार का.? तसेच शहरात टॉप टेरेसवर बेकायदेशीर रित्या असणाऱ्या हॉटेलवर आता तरी कारवाई होणार का? हे एक प्रश्नचिन्हच आहे. एखाद्या मोठ्या घटनांच्या पुनरावृत्तीची वाट हे प्रशासन पाहणार आहे का? असे या भागातील नागरिक या घटनेच्या नंतर बोलताना दिसत होते. परंतु या आगीत हाॅटेल जळून भस्मसात झाले आहे. परंतु या आगीत हाॅटेलचे किती आर्थिक नुकसान झाले आहे.हे मात्र समजू शकले नाही.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.