Arrested : घरफोडी चोरी व वाहन चोरी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर तपास पथकाचे प्रभारी अधिकारी गजानन जाधव,सहा. पोलीस निरीक्षक हे तपास पथकातील स्टाफसह गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस नाईक अजित फरांदे व पोलीस अंमलदार साईनाथ रोकडे यांना सराईत गुन्हेगार इसम नामे लोकेश रवि पाटील,वय 22 वर्ष,रा. पुणे हा केसनंद गाव येथे येणार असलेबाबत खात्रीशीर माहिती मिळाली. सदर बातमीचे अनुशंगाने तपास पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक,गजानन जाधव यांनी तपास पथकातील स्टाफचे मदतीने केसनंद रोडवर जोगेश्वरी मिसळ समोर सार्वजनिक रोडवर नाकाबंदी लावुन नाकाबंदी दरम्यान दिनांक 30/09/2022 रोजी सराईत गुन्हेगार नामे लोकेश रवि पाटील,वय-22 वर्ष,रा.पाटील वस्ती,केसनंद गाव,ता.हवेली,जि.पुणे यास ताब्यात घेवुन त्याच्याकडे अधिक तपास केला असता,त्याने लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोरी व घरफोडी चोरी केली असल्याची कबुली दिल्याने,त्याचेकडुन 06 दुचाकी वाहने व घरफोडी गुन्हयातील माल असा एकुण 2,77,734/- रुपये किंचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सराईत गुन्हेगारास अटक करण्यात आलेली असुन,पुढील अधिक तपास लोणीकंद पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कामगिरी श्री.नामदेव चव्हाण,अपर पोलीस आयुक्त,पुर्व प्रादेशिक विभाग,पुणे शहर, श्री.रोहीदास पवार,पोलीस उप-आयुक्त,परिमंडळ-4,पुणे शहर, श्री.किशोर जाधव,सहा.पोलीस आयुक्त,येरवडा विभाग,पुणे शहर, श्री.गजानन पवार,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,लोणीकंद पोलीस ठाणे,पुणे शहर, श्री.मारुती पाटील,पोलीस निरीक्षक,(गुन्हे),लोणीकंद पोलीस ठाणे,पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक,गजानन जाधव, पोलीस अंमलदार बाळासाहेब सकाटे, अजित फरांदे, स्वप्निल जाधव, विनायक साळवे, कैलास साळुंके, सागर जगताप, साईनाथ रोकडे, अमोल ढोणे, पांडुरंग माने, दिपक कोकरे, आशिष लोहार यांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.