Deadbody found near Union Minister Rane's farmhouse : केंद्रीय मंत्री राणेंच्या फार्महाऊसजवळ सापडलेल्या मृतदेहाचा मारेकरी अखेर सापडला ,पुणे कनेक्शन आले समोर

मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळा खिंडीमध्ये मागच्या दिड महिन्यापूर्वी थांबून असलेल्या ऑडी कारमध्ये एक मृतदेह आढळून आला होता. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या फार्म हाऊसजवळ एका कारमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. तेव्हा पनवेल परिसरात लाल रंगाच्या ऑडी कारमध्ये सापडलेला मृतदेह संजय कार्ले नावाच्या व्यक्तीचा असल्याचे समोर आले. दरम्यान हा घातपात की आत्महत्या यावर जोरदार चर्चा सुरू होती. ही कार महामार्गाच्या बाजूला उभी केलेली आढळून आली. या व्यक्तीचा मृतदेह अन्यत्र गोळी झाडल्यानंतर कारमध्ये ठेवण्यात आला होता की त्याला कारमध्येच गोळ्या घातल्या होत्या, याचा पोलीस तपास करत होते. दरम्यान नवी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने पुण्यात दोघांना अटक केली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर ऑडीमध्ये खून करून मृतदेह ठेवलेल्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना अखेर या तपासतून यश आले आहे.
तब्बल 45 दिवसानंतर संजय काल हत्येतील आरोपींना पकडण्यात आले आहे. नवी मुंबई पोलिसांच्या क्राईम बेचने पुण्यावरून दोघांना अटक केली आहे. संजय कार्ले याचा खून करून आरोपी नेपाळमध्ये पसार झाले होते. कमी किमतीमध्ये सोने देतो असं सांगून फसवणूक करण्याचा मृत इसमाचा उद्देश असल्याची माहिती समोर आली आहे. हा उद्देश लक्षात आल्याने आरोपींनी त्याच्याच पिस्तूलने पाच गोळ्या झाडात संजय कार्लेची हत्या केल्याची माहिती पोलीस सुत्रांकडून मिळाली आहे.
मोहसीन मुल्लाणी आणि अंकित कांबळे अशा दोन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. मृत इसम आणि दोन्ही आरोपी सान्हाईत गुन्हेगार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींवर पाच तर मृत व्यक्तीवर 8 गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. दोन्ही आरोपी आणि वापरात आलेली पिस्तुल पोलीसांनी ताब्यात घेतली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
तर आत्ता जाणून घेऊया संजय कार्ले कोण आहे ?
संजय कार्ले हा सोन्याची बनावट नाणी विकून अनेकांची फसवणूक करायचा, संजयवर अनेक गुन्हे दाखल झाल्याने त्याच्यावर मोक्का लावण्यात आला होता. तो पोलिसांच्या अटकेत ही होता सहा महिन्यांपूर्वीच तो पॅरोलवर बाहेर आला होता. त्यानंतर त्याच्या हत्येचीच बातमी समोर आल्याने खळबळ उडाली होती.
डुप्लीकेट गोल्डन कॉईन देवून लोकांना फसवणूक करण्याच्या प्रकरणी तो सवधीचा गुन्हेगार होता असेही समजते. बंद गाडीत मागच्या सीटखाली मृतदेह कॉबलेल्या अवस्थेत होता. हा मृतदेह संजय कार्लेचा असल्याची माहिती आहे, संजय हा मूळचा पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील रहिवासी होता.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.