Crime : हात उसने घेतलेले पैसे परत न दिल्याने सावकारांने पती समोरच पत्नीवर केला अत्याचार हडपसर पोलिसांनी सावकारांच्या आवळल्या मुसक्या

पुणे दिनांक २६ जुलै ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) पुण्यातीलहडपसर भागात एक खळबळ जणक घटना घडली असून खासगी सावकारांने एका महिलेवर तिच्या पती समोर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. हात उसने घेतलेले पैसे पती परत देऊ शकला नाही म्हणून सावकारांने हे कृत्य केले आहे. महिलांने या घटने बाबत हडपसर पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिल्या नंतर पोलिसांनी आरोपी सावकांराच्या मुसक्या आवळल्या आहेत.
सदर घटने बाबत हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर महिलांच्या पतीने या खासगी सावकारांकडून हात उसने घेतलेले पैसे पती परत देऊ शकला नाही म्हणून सावकारांने सदर महिलांच्या पती समोरच त्याच्या पत्नीवर बलात्कार केला आहे. ही घटना पुण्यातीलहडपसर भागात फेब्रुवारी २००३ मध्ये घडली आहे. मात्र या बाबत एका ३४ वर्षीय विवाहित महिलांने या बाबत मंगळवारी हडपसर पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी इम्तियाज हसीन शेख याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पीडीत महिलांच्या पतीला शेख यांने हात उसने पैसे दिले होते. सदरचे पैसे फिर्यादी यांचा पती देऊ शकला नाही म्हणून. त्यामुळे त्यांने पतीला जीवेठार मारण्याची धमकी दिली व आरोपी यांने पती आणि पत्नी यांना घरी बोलावले त्या नंतर आरोपींने फिर्यादींच्या पतीला समोर बसवून चाकूचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देउन त्या नंतर फिर्यादी सोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले .
व आरोपी शेख या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईल मध्ये शुट केला होता. आणि सोशल मिडीयावर व्हायरल केला होता. या घटने बाबत पीडीत महिलांने हडपसर पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. त्या नंतर पोलिसांनी आरोपी शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेनंतर पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. खासगी सावकार यांच्या दादागिरी मध्ये प्रचंड वाढ झाली असून यांच्या वर आता पोलिसांनी या वेळीच मोठी कारवाई करणे अपेक्षित आहे. अशा पुणे करांच्या पोलिस खात्याकडे अपेक्षा आहेत. या प्रकरणी पुढील तपास हडपसर पोलिस करीत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.