Crime : किशोर आवारे खूनातील फरारी उपनगराध्यक्ष भानू खळदेच्या पिंपरी चिंचवड पोलीसांनी नाशिक मधून आवळल्या मुसक्या

पुणे दिनांक ८.( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार माजी उउपनगराध्यक्ष चंद्रभान उर्फ भानू खळदे याला अखेर नाशिक येथून पिंपरी चिंचवड पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत. खळदे हा दीड महिन्यापासून पोलीसांना गुंगारा देत होता.
दरम्यान तळेगाव दाभाडे येथे भरदिवसा नगर परिषदे समोर किशोर आवारे यांची गोळ्या झाडून व कोयत्याने डोक्यात वार करून १२.मे रोजी त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी माजी नगरसेवक चंद्रभान खळदे .यांचा मुलगा गौरव खळदेचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. त्या नुसार तपासात त्याच्या कडे चौकशी केली या कटकारस्थान मध्ये चंद्रभान खळदे यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते.
डिसेंबर २०२२ मध्ये वृक्ष तोडीच्या प्रकरणातील वादातून किशोर आवारे यांनी मुख्याधिकांच्या कार्यालयात चंद्रभान खळदे यांच्या कानाखाली मारली होती. यातूनच याचा बद्दला घेण्यासाठी सुपारी देउन किशोर आवारे यांचा खून करण्यात आला होता. यात चंद्रभान खळदे यांचा सहभाग होता. खून झाल्या पसून ते फरार होते. पोलीस त्याचा शोध घेत होते पण तो सतत गुंगारा देत होता. पण आज पिंपरी चिंचवड पोलीसांनी नाशिक मधून अखेर चंद्रभान खळदे यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.