Crime : रात्रीच्या वेळेस पालघनचा धाक दाखवून प्रवासींना लुटणा-यांस पोलीसांनी केले गजाआड

पुणे दिनांक १५ ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) रात्रीच्या वेळी प्रवासी यांना पालघन व धारदार शस्त्राचा धाक दाखवून लुटणा-या अट्टल व सराईत गुन्हेगारास युनिट ४ च्या गुन्हे शाखा पुणे शहर यांनी त्याचा मुसक्या आवळल्या आहेत व त्यांच्या कडून दोन गुन्हे उघडकिस आणले आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या नाव.१) साहिल उर्फ मोबासाई समीर शेख ( वय २१.राहणार. यशवंत नगर मच्छिं मार्केट मागे शेलार चाळ येरवडा पुणे) व एक बालअपचारी यांचा समावेश आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहरातील शरीराविरूध्द व मालमत्तेचे विरोधी दाखल गुन्ह्याचा तपास करून सदरचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत आदेश दिले होते. त्या बाबत गुन्हे शाखा पुणे शहर युनिट ४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी मोहिम राबविण्या साठी आदेश दिले होते. त्याच अंनुषंगाने मोहिम राबवून उपनिरिक्षक जयदीप पाटील पोलीस अंमलदार संजय आढारी .प्रविण भालचिम .विनोद महाजन.नागेश सिंग कुॅवर .स्वप्निल कांबळे. असे पोलीस स्टेशन विमानतळ गु.र.नं. ३९२ \ २०२३.व येरवडा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ४४३ \ २०२३.असे अज्ञात आरोपी विरोधात चोरीचे गुन्हे दाखल होते.
यातील आरोपी हे विमान नगर येथील सिंम्बोयसिस काॅलेज जवळ. कल्याणी नगर .येरवडा .या भागात रात्रीच्या वेळी प्रवासी यांना पालघन व धारदार शस्त्राचा धाक दाखवून लुटणारे चोरटे हे पार्किंग ०३ संगमवाडी येथे बसले आहेत. अशी माहीती पोलीस यांना खबर मिळाल्या नंतर त्यांना अटक करून त्याचा कडून चोरीचा मोबाईल व एक पालघन. असा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांना विमान नगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर रामनाथ पोकळे. पोलीस उपयुक्त गुन्हे शाखा अमोल झेंडे. सह.पोलीस आयुक्त गुन्हे. २.सतिश गोवेकर. यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने.पोलीस उपनिरिक्षक. जयदीप पाटील. महेंद्र पवार. पोलीस अंमलदार संजय आढारी .प्रविण भालचिम. विनोद महाजन. नागेश सिंग कुॅवर स्वप्निल कांबळे. व युनिट ४ च्या पथकाने केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.