Crime : छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी आक्षेपार्ह ऑडियो क्लिप व्हायरल करणा-यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पुणे दिनांक ६ ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) अहमदनगर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून ते सोशल मिडीयावर व्हायरल केल्याची घटना घडली आहे. यानंतर संपूर्ण अहमदनगर मध्ये खळबळ उडाली आहे. सदरची घटना ही शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली असून .या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाच्या मुसक्या आवळल्या आहेत.
दरम्यान या घटने बाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अहमदनगर शहरातून ताब्यात घेतलेल्याचे नाव अरमान नईम शेख ( रा.मुकुंद ननर ) असे त्यांचे नाव आहे.याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह भाषेत बोलून ते रेकॉर्ड केले. व रेकॉर्ड केलेली ऑडिओ क्लिप ही सोशल मिडीयावर व्हायरल केली. ही क्लिप व्हायरल झाल्या नंतर याला ऐका व्यक्तीने अरमान याला फोन केला असता. त्या तरूणांने पुन्हा आक्षेपार्ह भाषेत व्यक्तव्य करून हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या. ही क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल होताच याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक ओला यांना मिळताच पोलिस यंत्रणा सतर्क झाली.
दरम्यान या घटने बाबत त्वरित ॲकशन घेण्याबाबत गुन्हे अन्वेषण पथकाला सांगितले व त्या नंतर पोलिस निरीक्षक आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक विश्लेषण करून ही ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यां-या अरमान शेख याला अहमदनगर शहरातून ताब्यात घेतले आहे. व त्याला भिंगार पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पुढील तपास भिंगार पोलिस करीत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.