पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा पोलिसांची मोठी कारवाई : कोयत्याचा धाका दाखवून सोनसाखळी मोबाईल व वाहनचोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पिंपरी चिंचवड दिनांक २२ ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पिंपरी चिंचवड मध्ये महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून चोरीच्या घटनेत मोठी वाढ झाली होती.या वाढत्या चोऱ्यांना आळा बसविण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त श्री विनयुमार चौबे. यांनी याबाबत गुन्हे शाखेच्या पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते.त्याआदेशानुसार गुन्हे शाखेच्या उप-आयुक्त स्वप्ना गोरे .व सहाय्यक पोलिस आयुक्त सतिश माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनूट दोनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम व अन्य अधिकारी व कर्मचारी यांनी रेकाॅर्ड वरील गुन्हेगार यांचा शोध घेतांना तांत्रिक विश्लेषण द्वारे पोलिसांना गुन्ह्यांतील आरोपी बाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
दरम्यान याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार अटक आरोपी याप्रमाणे १) महंमद मुस्ताक सिध्दिकी ( वय २४ रा.लातूर ) २) पांडुरंग बालाजी कांबळे ( वय२३ रा.निलंगा.जि.लातूर ) ३) तुषार उर्फ बाळ्या अशोक माने ( वय २४ रा.तळेगाव दाभाडे पुणे) ४) अर्जून संभाजी कदम ( वय २५ रा.चिखली पुणे मुळ रा.निलंगा जि.लातूर ) अशी आहेत यात अन्य चार अल्पवयीन मुलं आहेत या सर्वीांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले आहे.व चोरीचे दागिने विकत घेणारा पक्षाल मनोज सोलंकी ( वय २३रा.चिंचवड पुणे) व मुराद दस्तगीर मुलाणी ( वय रा.पिंपरी गाव मुळ रा.खटाव जि.सातारा ) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपी यांनी गुन्ह्यात वापरलेले ४ जम्बो कोयते.एक तलवार चोरीच्या पाच मोटरसायकल.सात महागाडे मोबाईल.असा एकूण २ लाख ४२ हजार ४०० रुपयांचा किमतीचा मुद्देमाल व २ लाख ५० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने.असा एकूण ५ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.व आरोपी यांनी पिंपरी चिंचवड व लातूर या ठिकाणी केलेले गुन्हे उघडकीस आणले आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त श्री.विनय कुमार चौबे.सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ.श्री.संजय शिंदे.अपर पोलिस आयुक्त श्री.वसंत परदेशी.पोलिस उप- आयुक्त गुन्हे श्रीमती स्वप्ना गोरे.सहाय्यक पोलिस आयुक्त श्री सतिश माने.यांच्या मार्गदर्शना खाली गुन्हे शाखा दोनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम व पोलिस उपनिरीक्षक गणेश माने .व पोलिस अंमलदार यांनी ही कारवाई केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.