शोरुम मध्ये चोरी करणारी आंतरराज्य टोळी : वाहनांच्या शोरूममध्ये चोरी करणाऱ्या आंतरराज्यातील टोळीच्या पुणे पाचच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पुणे दिनांक २३ ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील चारचाकी वाहनांच्या शोरूममध्ये चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यांच्या टोळीच्या गुन्हे शाखा युनूट पाचच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत.या चोरट्यांनी महाराष्ट्र राज्य सह.कर्नाटक व गोव्यात एकूण २१ गुन्हे केल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे.या आरोपींकडून ६ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे १) सावन दवल मोहिते ( वय १९ ) २) सोनू नागुलाल मोहिते ( वय २२) ३) जितू मंगलसिंग बेलदार ( वय२३ ) अभिषेक देवराम मोहिते ( वय २३ रा.चौघेजण बोधवड जिल्हा जळगाव) बादल हिरालाल जाधव ( वय १९ रा.मुक्ताई नगर जळगाव) पिंटू देवराम चौहान ( वय १९ रा. इंदूर मध्यप्रदेश अशी आहे.या आरोपींनी बिबवेवाडी भागातील शोरूममध्ये चोरी करून ४ लाख ९६ हजार रुपयांची रक्कम चोरली होती.आरोपी हे जळगावच्या पासिंग असलेल्या वाहनांच्या तून आल्याचे समजल्यावर पोलिस पथक जळगावल गेले तिथे आरोपींची ओळख निष्पन्न झाली पण आरोपी हे उत्तर भारतात फिरण्यासाठी गेले आहेत.व रेल्वेने मुंबईला गेल्याची माहिती मिळाल्यानंतर मुंबई येथे वांद्रे भागात सापळा रचून आरोपींना सहाही पकडले आरोपींनी गुन्ह्यांची कबुली दिली असून आरोपी हे रेकाॅर्ड वरील गुन्हेगार असून त्यांनी संगनमताने पुण्यासह कर्नाटक व गोवा राज्यात देखील शोरूममध्ये चोरी केल्याचे समोर आले आहे.
सदरची कामगिरी ही गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे.सहाय्यक पोलिस आयुक्त सतिश गोवेकर.यांच्या मार्गदर्शनाखाली युनूट पाचचे पोलिस निरीक्षक उल्हास कदम.सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा बाबर.उपनिरीशक अविनाश लाहोटे.अंमलदार चेतन चव्हाण.राजस शेख.पृथ्वीराज पांडुळे.राहुल ढमढेरे.विलास खंदारे.दाउद सय्यद.अमित कांबळे.रमेश साबळे.दया शेगर.यांच्या पथकाने केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.