पुणे गुन्हे सामाजिक सुरक्षा शाखेची मोठी कारवाई : पुण्यातील गरीब व अशिक्षित महिलांना आखाती देशात नेउन विक्री प्रकरणी मुख्य दलालांच्या पुणे गुन्हे शाखेने मुंबईतून आवळल्या मुसक्या

पुणे दिनांक २१ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) आखाती देशात नौकरी लावण्याच्या आमिषाने पुण्यातील तीन महिलांना आखाती देशात नेउन व तिथे डांबून ठेऊन या महिलांचा छळ केल्या प्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुंबई मधील माहिममधून मुख्य दलालांच्या मुसक्या आवळून त्याला पुण्यात आणले आहे.
दरम्यान याप्रकरणी पुणे गुन्हे शाखेच्या वतीने सांगण्यात आले की अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव मोहम्मद फैयाज अहमद याह्या ( वय २८ रा.ओशविरा .मुळ रा.कर्नाटक) असे आहे.याचा अन्य एक साथीदार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.याच्या विरोधात दोन महिलांनी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.याने पुण्यातील गरीब व अशिक्षित महिलांना आखाती देशात महिना ४० हजार रुपयांची नौकरी लावण्याच्या आमिषाने सौदी अरेबियातील रियाध येथे साफसफाईचे काम मिळवून दिले पण तिथे त्यांचा छळ करण्यात आला होता.या महिलांना चार लाख रुपयांना विकण्यात आले होते.या प्रकरणी सामाजिक सुरक्षा शाखेच्या पोलिस तपास करत असताना आरोपी बाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मुंबई मधील माहिम भागातून आरोपींच्या मुसक्या आवळून त्याला पुण्यात आणले आहे.ही कामगिरी गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे उपायुक्त अमोल झेंडे.व सामाजिक सुरक्षा विभागाचे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक राजेश माळेगावे अंमलदार राजेंद्र कुमावत.तुषार भिवरकर.अमित जमदाडे.मनिषा पुकाळे.यांच्या सह पथकाने केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.