मोबाईल चोरट्यांकडून २० मोबाईल ३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त : पुण्यात गणेशोत्सवात भाविकांचे मोबाईल चोरणाऱ्या परराज्यातील टोळीच्या पुणे पोलिसांनी आवळल्या चौंघाच्या मुसक्या

पुणे दिनांक २३ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे शहरात सर्वत्र गणेशोत्सव सुरु आहे.व मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे.दरम्यान याच गर्दीचा फायदा घेऊन भाविकांचे एकूण २० महागाडे मोबाईल चोरी केले होते.या चोरट्यांनी फरासखाना.बंडगार्डन. व स्वारगेट.हडपसर.या भागातून मोबाईल चोरी केले होते. आरोपी हे उत्तरप्रदेश.झारखंड.व पश्चिम बंगालचे असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
दरम्यान पुणे शहरातील उपनगर परिसरात देखील मोठ्या प्रमाणावर भाविक गणेशोत्सव करीता व देखावे पाहण्यासाठी येतात व त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन हे चौघेजण मोबाईल चोरी करत होते.याचवेळी गस्तीवर असलेल्या पोलीसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या चौघाजणांच्या मुसक्या आवळल्या आहेत व त्यांच्या कडून एकूण २० मोबाईल ३ लाख ८० रुपयांचे जप्त केले आहे.सदरची कामगिरी ही परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त विक्रम देशमुख.सहाय्यक पोलिस आयुक्त आश्र्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके यांच्या पथकाने केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.