Crime : पुण्यातील येरवडातील इझी पे प्रा .लि.कंपनीला तब्बल साडेतीन कोटी वेबपोर्टलॲप द्वारे गंडा घलणा-या ठक्का च्या पुणे पोलीसांनी पश्चिम बंगाल मधून आवळल्या मुसक्या

पुणे दिनांक १५ ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) पुण्यात येरवडा येथे इझी पे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून संपूर्ण भारत भर ऑनलाईन पेमेंटची सुविधा पुविण्यांचे कामकाज या कंपनीच्या माध्यमातून चालते.दिनांक ११ऑगस्ट २०२२.पसून कंपनी मध्ये नोंदणी कृत असलेल्या ६५ एजंट यांनी आपसात कट रचून व संगनमत करुन कंपनीच्या वेब पोर्टल अॅप द्वारे कंपनीच्या अधिकृत यंत्रणेत कंपनीची फसवणूक करण्याच्या उद्देशाने अधिकृत केलेल्या मोबाईल व्यतिरिक्त २ ते ४ व त्या पेक्षा जास्त वेग वेगळ्या मोबाईल संचाचा वापर करून अनधिकृत पणे .त्या मोबाईल द्वारे लाॅग ईन आयडीने लाॅग इन कंपनीच्या तांत्रिक सुविधांचा गैरवापर केला व कंपनीच्या व्हीपीए खात्या मधून अन्य ४४.बॅक खात्यावर एंजटचे कमिशन व्यतिरिक्त ३.५२ .७०.२१०.८२ रूपायांची कंपनीचीफसवणूक केली. या बाबत कंपनीच्या वतीने सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर येथे तक्रार दिल्या नंतर पोलीसांनी गु.र.नं.२०.\ २०२३प्रमाणे गुन्हा दाखल झाल्या नंतर पोलीसांनी पश्चिम बंगाल मधून एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत .
सदर गुन्ह्याचातपासकरून व तांत्रिक विश्लेषण करता या गुन्ह्यातील संशयित आरोपी अंकित कुमार अशोक पांडे यांच्या मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणावरून तो दिल्लीत असल्याचे दिसून येत होते .त्या नुसार सायबर पोलीस स्टेशन कडील पथक दिल्ली येथे गेले. असता त्यांचे लोकेशन हे पश्चिम बंगाल येथे असल्याचे मिळून आले.या वरून पोलीस यांच्या निदर्शनास आले की आरोपी हा एका ठिकाणी जास्त का वास्तव्यास थांबत नाही. दिल्ली येथून पोलीस पथक आरोपीचा पाठलाग करत पश्चिम बंगाल येथे पोहचले. तेथील गाव मामरा दुर्गापूर बर्धमान जिल्हा येथे जावून आरोपी अंकित कुमार अशोक पांडे. ( वय २० राहणार अरविंद मिश्रा यांचे घर सी/ १८.निबे दितो पार्क ममरा दुर्गा पूर .बर्धमान.) पश्चिम बंगाल येथून ताब्यात घेतले. व त्यांच्या कडून मोबाईल फोन. व २ लॅपटॉप. हस्तगत करण्यांत आले. आरोपींचा मुळ पत्ता महेश दिन गाव काजीया .गोडापूर .नावदा .बिहार असे असल्याचे त्यांने तपासा अंती सांगितले हा गुन्हयात अटक होऊ नये.वेग वेगळ्या राज्य मध्ये लपून छपून वास्तवे करीत हेता.त्यास सायबर पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक तुषार भोसले व अंमलदार राजकुमार जाबा .बाबासाहेब कराळे.नवनाथ जाधव. बापू लोणकर .निलेश लांडगे.यांनी आरोपीचा शोध घेत त्याच्या पश्चिम बंगाल येथून मुसक्या आवळल्या आहेत .त्याला पुण्यातील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १९ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त रितेश कुमार व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक.अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर रामनाथ पोकळे. पोलीस उपयुक्त आर्थिक व सायबर गुन्हे श्रीनिवास घाडगे. सहाय्यक पोलीस आयुक्त. आर्थिक व सायबर गुन्हे आप्पा साहेब शेवाळे .यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती मिनल सुपे-पाटील. पोलीस उपनिरिक्षक तुषार भोसले व पोलीस अंमलदार. राजकुमार जाबा.बाबासाहेब कराळे.नवनाथ जाधव. निलेश लांडगे.बापू लोणकर .शाहरूख शेख. संदेश कर्ने.नितीन चांदणे.संतोष जाधव व पोलीस पथकाने यशस्वीपणे पार पाडली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.