Crimes : पत्रकारांवर गोळीबार करून फरार झालेल्या शाॅपशुटर च्या पुणे पोलिसांनी बंगळुरू मधून आवळल्या मुसक्या.

पुणे.दिनांक २४.( पोलखोल नामा ऑनलाईन न्यूज टीम ) पुण्यात जमिनीच्या वादातून ११.जून, रोजी रात्रीच्या वेळेस घरी जाणाऱ्या पत्रकारांवर रिव्हॉल्व्हर मधून गोळीबार करून फरार झालेल्या शाॅपशूटर श्रेयश मते याच्य पुणे पोलीसांनी बंगळुरु मधून मुसक्या आवळल्या असून त्याला घेऊन पुणे पोलीस टीम पुण्यात येत आहे.
श्रेयश मते ( वय. २१.राहणार नांदेड गाव पुणे ) असे या शाॅपशूटर चे नाव असून या घटने बाबत त्याच्या कडे चौकशी केल्यावर सदर घटनेचा घटना क्रम ऊलगडेल. व घटनेचा मुख्यसूत्रधार व अन्य माहीती कळेल. अशी माहीती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली आहे. एका वर्तमानपत्राचा उपनगर पत्रकार हा त्याच्या मोटरसायकल वरून घरी जात असतांना ११.जून रोजी रात्रीच्या वेळेस मोटरसायकल वरून आलेल्या पाच जणांनी अचनक पणे रिव्हॉल्व्हर मधून गोळीबार केला पण पत्रकार खाली वाकले मुळे हल्लेखोरांचा नेम चुकला व पत्रकार हा बाल बाल वाचला या सर्व प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे गुन्हे शाखाही या प्रकरणाचा तपास करीत होती. या पूर्वीच स्वारगेट पोलीसांकडून प्रथमेश उर्फ शंभू धनंजय तोंडे ( वय. २०.राहणार. राजेंद्र नगर. दत्तवाडी पुणे).व अभिषेक शिवाजी रोकडे ( वय २२.राहणार नांदेड गाव. पुणे) अटक केली आहेत. व व १३.अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. व त्याच अधारे मिळालेल्या माहितीच्य आधारे शाॅपशूटर श्रेयश मते बंगळरू येथून अटक करण्यात आली आहे. याच्या वर २.वर्षा पुर्वी हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.