Crime : इर्शाळवाडीतील बेपत्ता ५७ जणांना मृत घोषित करणार रायगड जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारला पाठवला प्रस्ताव

पुणे दिनांक २८(पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम)खालापूरातील इर्शाळवाडीतील दुर्घटना नंतर प्रशासनाच्या वतीने बचाव शोधमोहिम मध्ये एकूण २७ जणांचा मृतदेह ढिगारे उपसून बाहेर काढले मात्र ४ दिवसांनी शोध मोहिम थांबविण्यांत आली होती .या दुर्घटनेत एकूण ५७ जणांचा ढिगा-याखाली दबून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या सर्वांना मृत जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाच्या वतीने राज्य सरकारला पाठवला आहे.राज्य सरकारने हा प्रस्ताव मंजूर केल्या नंतर या दुर्घटनेतील मृतांची संख्या ८४ होणार आहे. व नंतर त्यांच्या वारसांना जाहीर केलेली मदत देण्यात येणार आहे.
इर्शाळवाडीतील १९ जुलै रोजी रात्रीच्या वेळेस दरड कोसळून ही दुर्घटना झाली होती या ठिकाणी एकूण २२८ नागरिक राहत होते. चार दिवस या ठिकाणी शोधमोहिम घेऊन ढिगारे उपसून २७ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत .तर १४४ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. सध्या यातील लोकांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था कंटेनर हाऊसमध्ये करण्यात आली आहे. रस्ता नागमोडी व छोटे रस्ते असल्या मुळे बचाव कार्यात खुप अडचणी निर्माण झाल्या होत्या.
त्यामुळे जेसीबी व अन्य मोठी बचाव कार्य करण्या साठी वर पोहचू शकली नाहीत .त्या मुळे शोधमोहिमेत अडथळे आले.व शोधमोहिम थांबविण्यांत आली व यातील एकूण ५७ जणांना बेपत्ता घोषित करण्यात आले होते. ढिगा-या खाली दबून त्यांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता गृहित धरून जिल्हा प्रशासनाच्या वतीने तसा प्रस्ताव आता राज्य सरकारकडे पाठविंण्यात आला आहे.
दरम्यान इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृत्यू झालेल्या वारसांना राज्य सरकारच्या वतीने ५ लाख रूपायांची मदत जाहीर करण्यात आली आहे. ही मदत देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने कार्यवाही सुरू केली आहे. या साठी मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या वारसांची माहिती संकलित करण्यात येत आहे. दरडी खालून काढलेल्या २७ मृतदेहांच्या वारसांना पुढील काही दिवसांत मदत देण्यात येईल. तसेच बेपत्ता असलेल्या ५७ नागरिकांना मृत घोषित केल्या नंतर त्यांच्या वारसांकडे ५ लाख लाखांची मदत सुपूर्द करण्यात येणार आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.