Crime : समृध्दी महामार्गावर अपघाची मालिका सुरूच आज पुन्हा एक अपघात

पुणे दिनांक ११जुलै ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम ) समृध्दी महामार्गावर अपघाची मालिका सुरूच आहे आज पुन्हा एकदा तशीच एक घटना घडली आहे. समृध्दी महामार्गावर जालन्या जवळ एक होंडा क्रेटा कार ही रोडच्या मधोमध अपघात होऊन पलटी झाली यात कार मधील एकूण ७ जण गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांना तातडीने पुढील उपचारा करिता जालन्यातील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात कारचे प्रचंड असे नुकसान झाले आहे.
दरम्यान अपघाता बाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार होंडा क्रेटा कार भरघाव वेगाने जात होती. सदरचा अपघात हा ड्राइव्हरला झोप लागल्या मुळे कार वरील नियंत्रण सुटले व कार रोडच्या मधोमध पलटी झाली. यात कार मधील एकूण ७.प्रवाशी हे जखमी झाले. त्यांना तातडीने पुढील उपचारा करिता जालन्यातील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.