Seven Dead Bodies Found In Bhima River were not Suicide but Murder : भीमा नदीत सापडले सात मृतदेह आत्महत्या नसून हत्या

दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीपात्रात 6 दिवसांमध्ये एकाच कुटुंबातील 7 जणांचे मृतदेह आढळले. या सात जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याचे म्हटले जात असतानाच त्याला वेगळे वळण मिळाले. त्यांच्या 4 चुलत भावानींच त्यांचा खून करुन मृतदेह नदीत फेकले असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून यामध्ये एका महिलेचा समावेश आहे, अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
मोहन उत्तम पवार (वय 45). संगीता उर्फ शहाबाई मोहन पवार (वय- 40 दोघे रा. खामगांव ता. गेवराई जि. बीड), त्यांचा जावई शामराव पंडित फुलवरे (वय-28) त्याची पत्नी राणी शामराव फुलवरे (वय-24) त्यांचा मुलगा रितेश उर्फ भैय्या शामराव फुलवरे (वय-7), छोटू फुलवरे (वय-5), कृष्णा (वय-3 सर्व रा. हातोला, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) अशी मृत्यू झालेल्या सात जणांची नावे आहेत. याप्रकरणी अशोक कल्याण पवार (वय-39), शाम कल्याण पवार (वय-35), शंकर कल्याण पवार (वय-37), प्रकाश कल्याण पवार (वय-24), कांताबाई सर्जेराव जाधव (वय-45 सर्व रा. ढवळेमळा निघोज ता. पारनेर, जि. अहमदनगर) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सगळे आरोपी हे एकमेकांचे भाऊ बहिण आहेत. या हत्याकांडामुळे पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये, मोहन पवार यांचा मुलगा तीन महिन्यापूर्वी अनिल पवार आणि त्याचा चुलत भाऊ धनंजय पवार हे एकत्र त्यांच्या पेरणे फाटा येथे असलेल्या सासुरवाडीला गेले असता त्यांचा अपघात झाला होता. धनंजय हा हॉस्पिटलमध्ये असतानाही मोहन पवार व त्याच्या मुलाने ही बाब सांगितली नाही. चार दिवसांनी धनंजयचा अपघात झाल्याची माहिती चुलत भावांना समजली. त्यानंतर धनंजय पवार यांचा मृत्यू झाला. धनंजयचा मृत्यू हा अपघात नसून घातपात झाल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांना होता. त्याचा राग मनात धरुन हे हत्याकांड करण्यात आले आहे.
मोहन आणि त्यांचे कुटुंबीय 17 जानेवारी रोजी भीमा नदी जवळ अल्यानंतर धनंजय याच्या घरच्यांनी त्यांना आडवले. त्यांनी मोहन पवार, त्याची पत्नी, मुलगी, जावई आणि त्यांच्यासोबत असलेल्या तीन मुलांना बेशुद्ध केले. सर्वजण बेशुद्ध झाल्यावर त्यांना भीमा नदीच्या पात्रातील पाण्यात फेकून देण्यात आले. पाण्यात बुडाल्याने सात जणांचा मृत्यू झाला.
दरम्यान, हे हत्याकांड अधश्रद्धेतून झाला असल्याची चर्चा आहे. मात्र पोलिसांनी याला दुजोरा दिलेला नाही. हे हत्याकांड अंधश्रद्धेतून झाले आहे का याचा तपास करण्यासाठी पोलिसांची पथकं तपास करीत आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी राहुल धस करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे,
उप विभागीय पोलीस अधिकारी दौंड विभाग राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे
यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे
पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, शिवाजी ननवरे,सहायक पोलीस उपनिरीक्षक तुषार पंदारे, हनुमंत पासलकर, मुकुंद कदम, काशीनाथ राजापुरे,पोलीस अंमलदार सचिन घाडगे, राजु मोमीन, जनार्दन शेळके, अजित भुजबळ, मंगेश थिगळे, योगेश नागरगोजे,विजय कांचन, चंद्रकांत जाधव, प्रमोद नवले, निलेश शिंदे, धिरज जाधव, मंगेश भगत, तुषार भोईटे, अमोल शेडगे,दगडु विरकर, अक्षय सुपे, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे,
पोलीस अंमलदार निलेश कदम, महेंद्र चांदणे, रामदास जगताप, अक्षय यादव, अजित काळे, प्रमोद गायकवाड,
यांच्या पथकाने केली.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.