Crime : तीन राज्यात एकूण घरफोडीचे ४५ गुन्हे दाखल असलेल्या अट्टल गुन्हेगाराचे सिंधुदुर्ग पोलीसांनी ३० लाखांच्या मुद्देमाल सह आवळल्या मुसक्या

पुणे दिनांक १३जुलै (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) आज सिंधुदुर्ग पोलीसांनी एका अट्टल गुन्हेगारांवर एकूण तीन राज्यात एकूण ४५.गुन्हे दाखल असलेल्या अट्टल गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या आहेत व त्यांच्या कडून एकूण ३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त केलेल्या मुद्देमाल मध्ये तलवारी रिव्हाॅलर. सोने .व चांदीचे दागिने. असा समावेश आहे.
दरम्यान या घटने बाबत सिंधुदुर्ग पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार. सिंधुदुर्ग पोलीस हे रात्रीच्या वेळी कणकवली पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असतांना घरफोडीचे गुन्हे दाखल असलेला गुन्हेगार हा प्रकाश विनायक पाटील हा कारने चालला होता पोलीसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता. त्याच्या कडून एक गावठी कट्टा. तीन जिंवत राउंड काडतुसे. तसेच बंदूक २७.जिवंत काडतुसे. ५.तलवारी.व एकूण ४ लाख ६८ हजार ८४४.रूपायांची रोक्कड दागिने. पैसे मोजण्याची मशिन सोने चांदी वितळवयाची मशिन .तीन ड्रिल मशिन. एक दुचाकी व एक फोर व्हिलर .असा सर्व एकूण ३० लाख ४८ हजार ७८४रूपायांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पाटील यांच्या विरोधात महाराष्ट्रात. गोवा .आणी कर्नाटक या तीन राज्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या विरोधात कणकवली पोलीस स्टेशन मध्ये पण गुन्हा दाखल आहे. १९४\ २३ कलम ३, २५ व ४.२५ भारतीय शस्त्र अधिनियम १९५९.अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत पुढील तपास कणकवली पोलीस करीत आहेत. दरम्यान या आरोपीचा शोध पोलीसां कडून चालू होता.पाटील हा घरफोड्या करण्यात सराईत असून. त्याच्या विरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण आठ गुन्हे. कोल्हापूर जिल्ह्यात नऊ गुन्हे. गोवा राज्यात चार गुन्हे. व कर्नाटक राज्यत २४.गुन्हे. असे सर्व मिळून त्याच्या विरोधात एकूण ४५ गुन्हे दाखल आहेत. व काही गुन्ह्यात हा फरार म्हणून घोषित आहे. आरोपी कडून हस्तगत केलेले अग्नी शास्त्र .तलवारी चाकू. सुरे .या सर्व गोष्टीचा साठा कशा करीता केला होता या बाबत कणकवली पोलीस तपास करत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.