Crime : मोक्यातील आठ महिन्यांन पसून फरार आरोपीच्या सिंहगड पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पुणे दिनांक २९ (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मोक्का कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल असलेला आरोपी मागिल आठ महिन्यांन पसून पोलिसांना चकमा देत होता. सदरचा आरोपी हा भुमकर चौका जवळ थांबल्याची खात्रीशीर रित्या पोलिसांना त्यांच्या खब-यां मार्फत मिळाल्या नंतर पोलिसांनी आज त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आकाश सुभाष गाडे ( वय २५ राहणार रामनगर राम मंदिरा जवळ सिंहगड रोड पुणे ) असे आहे. याच्या विरोधात सिंहगड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ४८३\ २०२२ भा.द.वी.कलम ३०७.५०४.५०६.( २).३४.आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल आहे.हा गेली आठ महिन्यांन पसून फरार होता. सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन निकम व पोलिस स्टाफ यांनी त्याला भुमकर चौकातून अटक केली आहे. व त्यांच्या कडे चौकशी केली असता त्यांने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी आता पुढील तपास सिंहगड रोड पुणे शहरचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही पोलिस उप-आयुक्त परिमंडळ ३ पुणे शहर सुहेल शर्मा. सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंहगड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हणे अभय महाजन व पोलिस निरीक्षक गुन्हे जयंत राजुरकर. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम. पोलिस उपनिरिक्षक गणेश मोकाशी. सहा फौजदार आबा उत्तेकर. पोलिस अंमलदार. संजय शिंदे. विकास पांडुळे. विकास बांदल. देवा चव्हाण. सागर शेंडगे. शिवाजी क्षीरसागर. राहुल ओलेकर .स्वप्निल मगर.दक्ष पाटील. अमोल पाटील. राजु वेंगरे.अविनाश कोंडे.यांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.