Crime : खून करून फरार झालेल्या रेकॉर्ड वरील आरोपीच्या आवळल्या मुसक्या

पुणे दिनांक ७.( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम )बिबवेवाडी मध्ये एका युवकाचा खून करून फरार झालेल्या व मोक्का कारवाईच्या गुन्हयातून नुकताच बाहेर आलेल्या व तेव्हा पसून फरार असलेल्या गुन्हेगारा बाबत वरिष्ठांच्या आदेशा नुसार तपास पथकातील पोलीसांनी मांगडेवाडी कात्रज येथून पोलीसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव संकेत उर्फ मोन्या संतोष विकारे. ( वय २७.राहणार राजगड चाळ राजीव गांधी नगर बिबवेवाडी पुणे )असे आहे. या बाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोन्या याने २४ मे रोजी याने श्रीकांत मच्छिंद्र जाधव ( वय ३८.राहणार राजगड चाळ राजीव गांधी नगर बिबवेवाडी पुणे )हा त्याच्या मित्रांन बरोबर गप्पा मारत असताना सुनिल पारेकर यांने श्रीकांत याला शिवी गाळ केली व हाताने मारहाण केली. या बाबत तो पोलीस चौकीत जात असताना. पारेकर व त्यांच्या इतर साथीदाराने श्रीकांत याच्या डोक्यात व कपाळावर वीटाने मारहाण करून त्याचा खून केला. या बाबत बिबवेवाडी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल आहे.
दरम्यान सदर गुन्हा दाखल झाल्या पसून हा फरार आहे. तो नुकताच मोक्का गुन्हयातून सुटला आहे. व तेव्हा पसून तो फरार होता. तपास अअधिकारी यांनी त्याचा पाठलाग करून मांगडेवाडी कात्रज पुणे येथून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. याच्या विरोधात मोक्का. खून. खूनाचा प्रयत्न. जबरी चोरी. दरोडा. विनापरवाना रिव्हाॅलर वापरणे. असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर. रंजन कुमार शर्मा. पोलीस उपयुक्त परिमंडळ. ५.पुणे विक्रांत देशमुख. सहाय्यक पोलीस आयुक्त शाहुराजे साळवे. वानवडी विभाग पुणे. शहर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती सविता ढमढेरे. पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीमती अनिता हिवरकर .तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे. पोलीस उपनिरिक्षक संजय आदलिंग. पोलीस हवालदार. संतोष जाधव. अभिषेक धुमाळ. शिवाजी येवले. प्रणव पाटील. सतिश मोरे. ज्योतिष काळे. तानाजी सागर. व अतुल महांगडे. यांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.