पोलिस आणि महानगरपालिकेच्या वतीने कारवाई कर्मचारी व पोलिस कर्मचारी यांच्यांत झटापट : कोल्हापूर अंबाबाई मंदिराच्या आवारातील चप्पल स्टॅंड हटविण्यात सुरूवात स्टॅंड धारक आक्रमक

पुणे दिनांक १० ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) कोल्हापूर मधील अंबाबाई मंदिर आवारातील चप्पल स्टॅंड हे बेकायदेशीर आहे.असे सांगून महानगरपालिकेच्या वतीने आज दिनांक १० ऑक्टोबर मंगळवारी सकाळपासून हे अतिक्रमण काढण्यासाठी कोल्हापूर महापालिकेच्या वतीने सुरुवात केली आहे. दरम्यान या कारवाईला कोल्हापूर मधील स्टॅंड धारक हे प्रंचड प्रमाणावर आक्रमक झाले आणि यावेळी पोलिस कर्मचारी आणि महानगरपालिकेच्या कर्मचारी यांच्यांत यावेळी झटपट झाली आहे.
दरम्यान यावेळी पोलिसांनी महिला आंदोलक यांना फरफटत बाहेर काढले व पुरुष आंदोलक यांना देखील धक्के मारत तेथून बाहेर काढले व या ठिकाणी असलेल्या स्टंँड हे जेसीबीच्या सह्हयाने तोडून हटविण्यात आले आहे.दरम्यान या मंदिराच्या आवारात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने अधिकृत चप्पल स्टॅंड सुरू केले आहे.व यापूर्वी असलेले स्टॅंड हे बेकायदेशीर आहे.असे सांगून हे महानगरपालिकेच्या वतीने काढून टाकण्याची कारवाई सुरू करण्यात आली होती.या कारवाईला स्टॅंड धारक यांनी विरोध केला.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.