Crime : स्वारगेट येथे तंबाखू व्यापारीवर फायर करून लुटमार करणां-या तिंघाजणांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बॅगलोर येथून आवळल्या मुसक्या

पुणे दिनांक २४ (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) स्वारगेट येथे तंबाखू विक्री करणां-या व्यापारी यांच्या वर गोळीबार करून लुटमार करण्यां-या तिंघाना जणांना गुन्हे शाखा युनिट २ पुणे शहर यांनी बॅगलोर येथे जाउन तेथून तीन आरोपींच्या मुसक्या आवळून २ रिव्हाॅलर व ३१ जिवंत काडतुसे व लुटलेली ३ लाख ५२ हजार ५००रूपायांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरच्या घटने बाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार. स्वारगेट येथे तंबाखू विक्री करणां-या व्यापारी यांच्या वर गोळीबार करून लुटमार करण्यात आली होती. या बाबत स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये या बाबत गुन्हा दाखल रजिस्टर नंबर १९२\२०२३भा.द.वी.कलम ३९७.३४.मधील आर्म अॅक्ट ३( २५)महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)सह१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हेचा तपास गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी पोलिस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाल्या नंतर पोलीस यांनी आरोपींच्या शोधमोहिम करिता दोन टीम तयार करून बॅगलोर येथे रवाना केल्या होत्या. या गुन्हयातील आरोपी हे चामरपेठ बॅगलोर परिसरात आहेत. पोलीसांनी तिथे जाऊन दोंघा जणांना ताब्यात घेतले तर त्याच्या तिसरा साथीदार अशा एकूण तिंघाच्या मुसक्या आवळल्या आहेत व त्यांच्या कडून दोन रिव्हाॅलर व ३१ जिवंत काडतुसे व लुटलेली ३ लाख ५२ हजार ५०० रूपायांचा मुद्देमाल जप्त केला आहे.व आरोपींना स्वारगेट पोलीसांनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या नावे १) अभयकुमार सुभोद कुमार सिंग ( वय २३ ) २ ) नितीश कुमार रमाकांत सिंग ( वय २२ दोघे रा.मार्केट यार्ड पुणे. मुळ रा.रामदिरी गाव बुगुसरा मटिहाणी ठाणा बिहार )३) मोहम्मद बिलाल तसुद हुसेन शेख ( वय २९ रा.आंबेडकर नगर मार्केट यार्ड पुणे)असे आहेत.या मध्ये अभय कुमार व नितिश कुमार हे दोघेजण मार्केट यार्ड मध्ये हमाली करतात या दोघांनी या लुटमारीतील २लाख रूपये वाटून घेतले होते. सदरची रोकड ही मार्केट यार्ड येथील घरातील पिशवीतून २ लाख रूपये व एक रिव्हाॅलर व २० जिवंत काडतुसे पोलिसांना काढून दिले. व तिसरा आरोपी शेख यांने त्याच्या राहत्या घरातून १ लाख २७ हजार रूपये व एक रिव्हाॅलर व ११ जिवंत काडतुसे काढुन दिले पोलीसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपासा करिता या आरोपींना स्वारगेट पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी ही पोलिस आयुक्त पुणे रितेश कुमार व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक .अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर रामनाथ पोकळे. पोलीस उप आयुक्त गुन्हे अमोल झेंडे. सहा.पोलीस आयुक्त गुन्हे सुनिल तांबे. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई. स.पो.नि.वैशाली भोसले. पोउपनि .नितीन कांबळे. पोउपनि .राजेंद्र पाटोळे .पोलीस अंमलदार. संजय जाधव. उज्वल मोकाशी. शंकर नेवसे. नामदेव रेणुसे. मोहसीन शेख. उत्तम तारू.राहुल राजापुरे.विनोद चव्हाण. साधना ताम्हणे. विजय पवार. गणेश थोरात. अमोल सरडे .प्रमोद कोकणे.गजानन सोनुने.निखिल जाधव. पुष्पेंद्र चव्हाण. व नागनाथ राख.यांनी केलेली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.