पुणे एक्स्प्रेसवे पुणे मार्गिका : मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवरील पुण्याकडे जाणारी वाहतूक व्यवस्था बंद राहणार,

पुणे दिनांक ३१ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) यंशवंतराव चव्हाण मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मह्तत्त्वाची बातमी असून उद्या १ सप्टेंबर रोजी मुंबई वरुन पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एमएसआरडीसी कडून कळविण्यात आले आहे की.दुपारी दोन वाजता रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे.कामा संदर्भात मुंबई - पुण्याकडे जाणारी मार्गिका बंद राहील .
यंशवंतराव चव्हाण मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गावर पुणे मार्गिका लोणावळा येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे.सदरचे काम हे १ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे.सदरच्या कामासाठी दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत पुण्याच्या बाजूकडून येणारी वाहतूक पूर्णतः पणे बंद राहील अशी माहिती देण्यात आली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.