Crime : मणिपूर मधील महिलांवरील अत्याचारांच्या घटनेचा तपास ' सीबीआय ' करणार केंद्रीय गृहमंत्रालयाचा निर्णय

पुणे दिनांक २७ जुलै ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) मणिपूरत सुरू असलेल्या घटना वरून संपूर्ण देशात तीव्र प्रतिक्रिया सगळ्या थरात मोठ्या प्रमाणावर उमटल्या नंतर व दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्यांचा व्हिडिओ सर्वत्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्या नंतर व संसदेत विरोधी पक्षांनी केलेल्या आंदोलन व या घटनेची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेत केंद्र सरकारला कारवाईचा इशारा दिला होता.
दरम्यान या सर्व घडामोडी नंतर केंद्र सरकार व मणिपूर सरकार आता उशीरा का होणं जागे झाले आहे.व या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत यातील आरोपींना अटक करण्यांच्या सुचना देण्यात आल्या आहेत. या नंतर पोलिसांनी तपासाची सूत्र वेगाने फिरवत यातील काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. व या नंतर आता या प्रकरणांचा तपास सीबीआय कडे देण्याचा निर्णय गृहमंत्रालयाने घेतला आहे. आता सीबीआय या संपूर्ण प्रकरणांची कसून चौकशी करणार आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.