Crime : दादर रेल्वे स्टेशन वर बॉम्ब असल्याची अफवा पसरविणारा युवक पुण्यातून गजाआड

पुणे दिनांक १७ ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम ) दादर रेल्वे स्टेशनवर बाॅम्ब आहे अशी आफवा पसरविणां-या युवकाला लोणी काळभोर पोलीस यांनी ताब्यात घेतले आहे. अफवा पसरविणारा युवक हा मनोरूग्ण आहे.
लोणीकाळभोर पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव योगेश शिवाजी ढेरे असे आहे. लोणीकाळभोर पोलीस हे गस्त घालत असतांना पाच वाजण्याच्या सुमारास लोणीकाळभोर येथील एका हाॅटेल जवळ एक युवक थांबला होता व तो युवक सांगत होता की दादर रेल्वे जंक्शन रेल्वे स्टेशन मध्ये बाॅम्ब आहे. हा काॅलर लोणीकाळभोर येथील आहे.अशी माहिती लोणीकाळभोर पोलीस यांना मिळालेल्यांने सदरच्या घटनेचे पोलीस यांनी गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस यांनी त्या ठिकाणी जाऊन योगेश ढेरे याला तिथेच हाॅटेल पसून ताब्यात घेऊन त्याच्या कडे चौकशी केली असता लोंकान मध्ये भिती निर्माण होऊन होऊन तिथे पळा पळ होईल व चेंगराचेंगरी होईल तसेच जीवीत हानी व्हावी या हेतूने आपण पोलीस यांना खोटी माहिती दिल्याचे योगेश यांने कबुली दिली आहे. तो मनोरूग्ण असल्याचे पोलीसांनी या वेळी सांगितले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.