Crime : पार्किंगचा वाद युवकाचा डायरेक्ट छाटला हात .पोलीसांनी शहरातून आरोपीची काढली वरात

पुणे दिनांक २३( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) नांदेड शहरात एक धक्कादायक घटना घडली असून. शुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका युवकाचा डायरेक्ट हातच छाटल्याची घटना घडली आहे. सदरच्या घटने नंतर या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदरच्या घटने नंतर पोलीसांनी आरोपीच्या मुसक्या आवळून त्याची शहरातून आता वरात काढली आहे
दरम्यान या घटने बाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चार दिवसा पूर्वी नांदेड शहरामधील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पार्किंग वरून दोन गटात वाद झाला होता. हा वाद पुढे वाढत जावून मारहाणीची घटना घडली होती. या वेळी आरोपींनी त्रिशरण थोरात या युवकाचा तलवारीने मनगटा पसून डायरेक्ट हात छाटला होता. या घटने नंतर शहरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल करत तातडीने १) सुरज बसवते २ ) आकाश रणमले .३) विजय जाधव. या तिघांना अटक केली. व गुन्हेगारांवर वचक राहवा या उद्देशाने भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुर्यमोहन बोलमवाड यांनी शहरातून आरोपींची वरात काढली आहे. या प्रकरणी पोलीसांचे नागरिकांना कडून स्वागत होत आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.