Theft in a government office : पुण्यात शासकीय कार्यालयात चोरी. चोरट्यांनी 'हे' ही पळवलं.

पुण्यातील शासकीय दूर शिक्षण तंत्र निकेतन कार्यालयात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
2007 ते 2019 या दरम्यानचे कागदपत्र चोरीला गेले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शासकीय दूर शिक्षण तंत्र निकेतन चे कार्यालय पुण्यात असून त्या ठिकाणी एक जुने बंद स्थितीत असलेले एक वसतिगृह आहे. या ठिकाणी एका खोलीचे कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी परीक्षा फॉर्म, मेरिट लिस्ट फाईल, संस्थेची संलग्नता प्रस्ताव, जुने शिष्यवृत्ती अर्ज, संस्थेचे एनओसी प्रस्ताव, पात्रता फॉर्म, पुनर्गुण मूल्यांकन अर्ज, फोटोकॉपी चे अर्ज असे महत्त्वाचे कागदपत्र चोरीला गेले आहेत.
हा सर्व प्रकार उघडकीस येताच पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. याप्रकरणी पुण्यातील चतुशृंगी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.