Crime : साता-यांत एकाच कुटुंबातील चौंघाचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ

पुणे दिनांक २१( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील सणबूर येथे आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौंघाचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटने बाबत कोणतेही ठोस कारण स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान सेवानिवृत्त शिक्षक १) आनंदा पांडुरंग जाधव २) सुनंदा आनंदराव जाधव ३) संतोष जाधव ४) पुष्पा धस .अशी त्यांची नावे आहेत. सकाळी ११ वाजेपर्यंत फोन करूनही काहीच उत्तर न आल्याने. आनंदा जाधव यांच्या जवळील नातेवाईकांने संबंधिताच्या घराकडे येऊन त्यांच्या घराचा दरवाजा वाजवला .पण आत मधून काहीच आवाज न आल्याने नागरिकांनी घराचा दरवाजा तोडूनघरात प्रवेश केला असता .त्या वेळी घरतील चौंघा जणांचा मृतदेह सापडले .या घटनेचे कारण आद्याप अस्पष्ट आहे. त्यांच्या मृतदेहाचे पोस्ट मार्टम केल्या नंतर मृत्यूचे कारण समोर येणार आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.