Crimes : आंळदीत लाठीमार झाला नाही. तर किरकोळ झटापट पोलीस आयुक्तांचा दावा.पण इतिहासात प्रथमच अशी दुर्दैवी घटना?

पुणे.दिनांक ११ ( पोलखोल नामा ऑनलाईन न्यूज टीम )संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आज प्रस्थान होतानाच मंदिर व्यवस्थापनाने घेतलेल्य एका निर्णाया मुळे वारकरी नाराज होते आणी त्यातच वारकरी आणी पोलिसांच्य मध्ये किरकोळ वाद झाल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजते. याचा एक व्हिडिओ देखील प्रसिद्ध झाला आहे.परंतू पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा दरवर्षी आयोजित केला जातो. आजही या सोहळ्यात सहभागी होण्या करीता मानाच्या ५६.पालख्य आल्या होत्या.गतवर्षी माऊलीचे दर्शन घेतांना चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण होउन काही महीला वारकरी जखमी झाल्यानंतर त्या मुळे पून्ह अशी घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आंळदी देवस्थान व प्रशासनाच्या वतीनेच जिल्हा न्यायाधीश व धर्मादाय आयुक्त व आंळदी मंदिर देवस्थान प्रमुख विश्वस्त याच्यात तीन वेळा बैठका झाल्यानंतर त्यात मानाच्या पालखीच्या प्रतेकी ७५.जणांनाच मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
अशी माहीती या वेळी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिली. आहे.मात्र आज अचानक पणे स्थानिक तरूणांनी मध्ये घुसण्यचा प्रयत्न केला. या वेळी या तरुणाना मंदिर प्रशासन व विश्वस्त यांनी देखील समजावण्याचा प्रयत्न केला.युवकांनी त्याच्या कडे दुर्लक्ष करून बॅरीकेट तोडून आत घुसण्यचा प्रयत्न केला.त्या वेळी पोलीसांकडून देखील त्यांना समजवयाचा प्रयत्न केला.त्या वेळेस स्थानिकांशी पोलीसाशी किरकोळ झटापट झाली या वेळेस कोणताही लाठीचार्ज झाला नाही व लाठीचार्जचा दावा आयुक्तांनी फेटाळला आहे.पोलीस प्रशासन हे वारकऱ्यांना चांगलेच सहकार्य करीत आहेत.वारीची महाराष्ट्रात चांगली परंपरा आहे.वारीला कोणीही गालबोट लावण्यचा प्रयत्न करू नये. अशी नम्र विनंतीच पिंपरी-चिंचवडचे आयुक्त विनय कुमार चौबे यांनी या वेळी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.