Thirty Thirty Scam Investment : "तीस-तीस ने गुंतवणूक दारांची फसवणूक केली फिक्स"

एका तरुणाने पैठण तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना व गाव पुढाऱ्यांसह शिक्षक, पोलिस, आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांना कोट्यांवधींचा गंडा घातला. ३०-३० योजनेत ५ ते ३० टक्के व्याज परताव्याचे आमिष दाखवत राठोड आणि त्यांच्या साथीदारांनी शेकडो लोकांना या जाळ्यात ओढले.
संबंधित तरुणाचे नाव संतोष राठोड आहे. विशेष म्हणजे कुठलीही लिखापढी किंवा कागद या गुंतवणूक आणि व्याज वाटपात केला गेला नाही. कोट्यावधींचे व्यवहार रोखीने व्हायचे. पाचशे कोटीहून अधिकचा हा घोटाळा, पण पुराव्याचा एक कागदही नसल्याने आरोपी बिनधास्त होते. पोलिसांत तक्रार केली तर तुझे पैसे बुडालेच म्हणून समज, अशा धमक्या गुंतवणूकदारांना दिल्या जायच्या.
त्यामुळे सुरुवातीचे ७-८ महिने व्याज तर सोडा पण मुद्दलीचे पैसे मिळत नसूनही कुणी पोलिसांत तक्रार द्यायला तयार नव्हते. कागदावर नसलेला तीस-तीस हा घोटाळा पाचशे कोटीपेक्षा अधिकचा असण्याची शक्यता वर्तवली गेली. राजकीय नेत्यांच्या मध्यस्थीने पैसे गुंतवले गेल्यामुळे तेही तक्रार न करण्यासाठी शेतकऱ्यांना धमकावत होते. त्यामुळे प्रत्यक्षात घोटाळा झाला असला तरीही त्याच कुठलेच पुरावे आरोपींनी मागे ठेवलेले नाहीत.
एका गुंतवणूकदाराने १३ लाख रुपये गुंतवले होते. सात महिन्यांपासून परतावा मिळत नसल्याने त्याने मध्यस्थाकडे तगादा लावला. वाद इतका टोकाला पोहोचला की मध्यस्थाने त्याला मारहाण केली. या प्रकरणी बिडकीन ठाण्यात गुन्हाही दाखल झाला. पण गुन्हा दाखल करण्यापूर्वीच तीस-तीसचा उल्लेख कुठे केलास तर पैसे मिळणारच नाहीत, अशी धमकी देण्यात आल्याने केवळ आर्थिक व्यवहारातून वादाचा फिर्यादीत उल्लेख केला गेला.
तक्रार केल्यास पैसे बुडतील या भीतीपोटी कुणी तक्रार देण्यास धजावत नव्हते, असे गुंतवणूकदार सांगायचे. पैठण तालुक्यातील बिडकीन, गिरनेरा, गिरनेरा तांडा, चिंचोली, वरवंडी, कापूसवाडी, डोणगाव, बोकूडजळगाव, जांभळी, पाडळी, बंगला तांडा, पोरगाव, देवगड तांडा, कचनेर, निलजगाव, घारदोन, गाडीवाट इत्यादी गावांतील शेतकऱ्यांची यात फसवणूक झाल्याचे उघड झाले होते.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.