मराठा आंदोलक आक्रमक : आज सकाळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची आंदोलंकानी केली तोडफोड तीन आंदोलंकाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पुणे दिनांक १नोव्हेबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रांचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची आज सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी गाडीवर तुफान दगडफेक करून गाडीची तोडफोड केली आहे.सदर घटना ही मुंबईतील आकाशवाणी आमदार निवास येथे घडली आहे.दरम्यान याठिकाणी पोलिस बंदोबस्त असतानाही गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. या तोडफोड प्रकरणी पोलिसांनी तिंघाना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान याप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार.काही वेळापूर्वी आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.मुंबईतील आकाक्षवाणी आमदार निवास समोर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची गाडी उभी होती.व आमदार निवास असल्यामुळे तिथे पोलिस उपस्थित असतात याचवेळी तीन हल्लेखोर तिथे आले व काही कळण्याच्या आत त्यांनी मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड केली आहे.दरम्यान आमदार निवासस्थानी अनेक गाड्या असतांनाही फक्त मुश्रीफ यांच्याच गाडीवर दगडफेक करून ती फोडली आहे.गाडीचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले आहे.दरम्यान बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.