Arrested : दुचाकी वाहने व बॅटया चोरणा-यास केले जेरबंद

पुणे शहरातील वाहन चोरीच्या गुन्हयावर आळा बसावा याकरिता मोहिम राबवून कारवाई करण्याकरिता वरिष्ठांनी आदेशित केले होते त्याप्रमाणे चंदननगर पोलीस स्टेशन गु.र.नं.285/2022 भा.दं.वि.कलम 379 या गुन्हयाचा तपास युनिट-6 मार्फत होत असताना, युनिट-6 कडील अंमलदार यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा रेकॉर्ड वरिल गुन्हेगार शुभम जांभूळकर रा. येरवडा पुणे याने केलेला असून तो डोमखेलवस्ती रोड जवळील मोकळे मैदानात वाघोली पुणे येथे थांबलेला आहे. त्याचे ताब्यातील गाडी ही सुध्दा चोरीची आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर बाबत श्री.रजनीश निर्मल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट-6, पुणे शहर यांना कळविले.
आदेशाप्रमाणे डोमखेलवस्ती वाघोली येथे सापळा रचून शुभम न्यानेश्वर जांभूळकर वय 24 वर्षे रा. लक्ष्मीनगर येरवडा पुणे यास ताब्यात घेतले. त्याचेकडे चौकशी करता त्याने गुन्हा केले बाबत कबुली दिली. सदर गुन्हयात त्यास अटक करुन पोलीस कस्टडीचे रिमांड घेतले. पोलीस कस्टडी दरम्यान आरोपकडे अधिक तपास करता चंदननगर पोस्टे, हडपसर पोस्टे, लोणवळा पोस्टे पुणे ग्रामीण, शिक्रापुर पोस्टे पुणे ग्रामीण व पाथर्डी पोस्टे अहमदनगर येथील प्रत्येक पोलीस स्टेशनचा 01 वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणून असे एकूण 05 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
सदर आरोपीने वानवडी पोस्टे, हडपसर पोस्टे, सिंहगड रोड पोस्टे, उत्तमनगर पोस्टे, निगडी पोस्टे येथील प्रत्येकी 01 बॅटरी चोरीचे व चाकण पोस्टे येथील 02 बॅटरी चोरीचे गुन्हे केल्याची कबूली दिल्याने पुणे आयुक्तालयातील एकूण 04 व पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील 03 बॅटरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. असे एकूण सदर आरोपीकडुन 12 गुन्हे उघडकीस आणून 1,69,500/- रु.किं. चे 05 दुचाकी वाहने व 14 बॅटया असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, युनिट-6, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हयाचा अधिक तपास करीत आहोत.
सदरची उल्लेखनिय कारवाई ही मा.पोलीस आयुक्त,पुणे शहर श्री.अमिताभ गुप्ता, मा.पोलीस सह आयुक्त, श्री.संदीप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. श्रीनिवास घाडगे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे - 2, श्री. नारायण शिरगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट - 6 चे पोलीस उप.नि. सुरेश जायभाय, पो.उप.नि. भैरवनाथ शेळके, अंमलदार मÏच्छद्र वाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले, प्रतिक लाहिगुडे, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, ज्योती काळे, अशफाक मुलाणी, व सुहास तांबेकर यांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.