Crime : ' ताज हॉटेल ' बाॅम्बने उडविण्याची अज्ञाताकडून धमकी, दोन पाकिस्तानी व्यक्ती सागरी मार्गाने मुंबईत प्रवेश करणार असल्याचाही अज्ञाताचा दावा

पुणे दिनांक १ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबईतील प्रसिद्ध हाॅटेल तिथं हे बाॅम्बच्या सहाय्याने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.तसेच दोन पाकिस्तानी नागरिक सागरी मार्गाने मुंबईत प्रवेश करुन ताज हॉटेल बाॅम्बच्या सहाय्याने उडवून देणार असल्याचा फोन मुंबई पोलिसांना आला आहे.मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला गुरुवारी हा फोन आला होता.हा निनावी फोन काॅल आल्यानंतर मुंबई मध्ये एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. गुरुवारी हा धमकीचा निनावी फोन आला . फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने असे सांगितले की.दोन पाकिस्तानी नागरिक हे सागरी मार्गाने भारतात प्रवेश करणार आहेत व मुंबई मधील ताज हॉटेल बाॅम्बच्या सहाय्याने उडवून देतील अशी धमकी दिली आहे.फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वताःचे नाव मुकेश सिंग असे सांगितले आहे.या नंतर एकच खळबळ उडाली आहे.या निनावी फोन नंतर पोलिसांनी तातडीने तपास करीत हा निनावी फोन करणाऱ्या व्यक्तीची शोध मोहीम घेतली असता सदरचा फोन हा मुंबईतील सांताक्रूझ येथे राहणाऱ्या जगदंबा प्रसाद ( वय ३५ रा.सांताक्रूझ मुंबई) नावाच्या व्यक्तीने केला आहे.प्रसाद हा मुळचा राहणारा उत्तर प्रदेश मधील गोंडा येथील असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.दरम्यान काल मंत्रालयात देखील बाॅम्ब ठेवल्याच्या निनावी फोन आला होता.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.