Crime : मुंबईच्या लोकल ट्रेन मध्ये साखळी बाॅम्ब स्फोटांची धमकी; मुंबई नियंत्रण कक्षाला फोन संपूर्ण राज्यात खळबळ

पुणे दिनांक ६ ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) मुंबईतील रेल्वे ट्रेन मध्ये साखळी बाॅम्ब स्फोट होणार असा धमकीचा फोन मुंबई पोलिसांना आला आहे. मुंबई नियंत्रण कक्षात आज सकाळी हा फोन आल्याचा सूत्रांनच्या द्वारे कळत आहे.दरम्यान मुंबई मधील रेल्वे ट्रेन मध्ये साखळी बाॅम्ब स्फोट होणार असा धमकीचा फोन मुंबई पोलिसांनी आला आहे. फोन वरील व्यक्तीने मुंबईत लोकलमध्ये बाॅम्ब ठेवल्याचा सांगितले आहे.
दरम्यान या बाबत महिला पोलिस काॅन्सटेबलने त्या व्यक्तींकडे अधिक चौकशी करण्याचा प्रयत्न केला. कोणती ट्रेन व बाॅम्ब कुठे ठेवला .त्याने या बाबत कोणतेही माहिती दिली नाही. मात्र कुर्ला. ठाणे. कल्याण. टिळकनगर.अशी वेग वेगळ्या ठिकाणांची नावे सांगितले. तु कोठून बोलत आहे असे विचारले असता जुहू विर्लेपार्ले असे सांगून याने फोन कट केला. या नंतर संपूर्ण पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.