नांदेड जिल्ह्यातील कंधार येथे सकल मराठा समाजाच्या तरुणांनी केली तोडफोड : भाजपचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्या गाडीसह तीन गाड्यांची मध्यरात्री तुफान तोडफोड

पुणे दिनांक २७ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा समाज आरक्षणांच्या मुद्द्यांवरुन चांगलाच आक्रमक झाला असून मध्यरात्री नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील अंबलुगा गावात भाजपचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्या गाड्यांचा ताफा मराठा सकल समाजाच्या तरुणांनी आडऊन एक मराठ व लाख मराठा अशा घोषणा करुन त्यांच्य गाडी फोडली व त्यांच्या ताफ्यातील अन्य दोन गाड्या देखील फोडल्या आहेत .सदरची घटना ही काल मध्यरात्री घडली आहे
दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल भाजप पक्षाचे खासदार प्रतापराव चिखलीकर हे नांदेडजिल्ह्यातील कंधार येथील अंबलुगा येथील गावातील कार्यकर्ते यांना भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी आक्रमक झालेल्या सकल मराठा समाजाच्यातरुणांनी शिवसेना खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्या गाडीची तोडफोड केली आहे .यात त्यांच्या ताफ्यातील अन्य दोन गाड्या फोडून सकल मराठा समाजाच्या तरुणांनी गावबंदी असतांना तुम्ही गावात का आला. असे म्हणून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या आहेत .मनोज जरांगे पाटील यांचा आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.