पोहण्यासाठी गेलेली तीन मुलांचा समावेश : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात तीन मुले बुडाली

पुणे दिनांक ८ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टिम ) पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली असून दौंड तालुक्यातील हातवळण येथील भीमा नदीच्या पात्रात पोहण्या साठी गेलेली तीन मुलांना नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने ही मुले बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली असून.आता या बुडालेल्या तीन मुलांचे मृतदेह पोलिस व स्थानिक मच्छीमारांच्या वतीने शोधमोहीम सुरू आहे.
दरम्यान याप्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दौंड तालुक्यातील हातवळण येथील भीमा नदीच्या पात्रात पोहण्या साठी सकाळी गेलेल्या तीन मुलांना नदीतील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ही मुले बुडाली आहेत. या भागातील अनेक उसाच्या गुऱ्हाळावर परप्रांतीय मंजूर काम करतात ही मुले गरीब परप्रांतीय यांची असून दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला आहे.सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी हजर झाले आहेत.व त्यांचं बरोबर गावातील नागरिकांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी देखील नदी पात्रावर गर्दी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.