जखमींवर अहमदनगर मधील रुग्णांलयात उपचार सुरू : अहमदनगर ते पुणे महामार्गावर ट्रॅव्हल्सची पिकअपला धडक एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे ११ जखमी

पुणे दिनांक १२ नोव्हेंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) अहमदनगर ते पुणे महामार्गावर चास शिवार येथे ट्रॅव्हल्सने पिकअपला जोरात धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीनजण ठार झाले असून ११ जण गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी अहमदनगर येथील रुग्णालयात उपचारा साठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान अपघातात ठार झालेल्या तिंघाची नावे १) प्रविण गोरख कागदे.२) सारिका मच्छिंद्र कागदे.३) दिपक चव्हाण अशी आहेत.तर अन्य ११ जण गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी अहमदनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.पहाटे पुणे येथून पिकअप अहमदनगर कडे जात असताना ट्रॅव्हल्सने पिकअपला जोरात धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. अपघात प्ररकणी अहमदनगर तालुका पोलिसांनी ट्रॅव्हल्स चालकाला ताब्यात घेतले आहे.अपघात मधील काही प्रवासी हे बीड जिल्ह्यातील आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.