मुंबई सांताक्रूझ हाॅटेल 🔥 : मुंबईतील हाॅटेलमध्ये भीषण आग 🔥 तिघांचा होरपळून मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी

पुणे दिनांक २७ ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम ) मुंबई मधील सांताक्रूझ भागात असलेल्या एका हाॅटेलच्या दुसऱ्या मजल्यावर आज दिनांक २७ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता भीषण अशी आग 🔥 लागली या आगीत आगीच्या ज्वाळा भंयकर होत्या त्यात ज्वालामध्ये होरपळून तीन कर्मचारी यांचा मृत्यू झाला आहे.तर अन्य पाच जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत.
दरम्यान या आगीत जखमी झालेल्या अन्य कर्मचारी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.असे वृत्त ' पी टी आय ' या वृत्त संस्थेने वृत्त दिले आहे.अग्निशमन दलाच्या वतीने सांगण्यात आले की.मुंबई मधील सांताक्रूझ भागातील हाॅटेल गॅलेक्सीला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आग लागली आम्हाला याबाबत काॅल आला आम्ही तातडीने घटनास्थळी पोहोचले व हाॅटेल गॅलेक्सी हाॅटेल मधून आठ जणांची प्रथम सुटका केली.व त्यांना तातडीने कपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.तर अन्य पाच जणांनवर उपचार सुरू आहेत.आग आटोक्यात आणली असून या आगीत हाॅटेलचे नुकसान झाले असून.सदरची आग कशामुळे लागली हे समजू शकले नाही.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.