पुणे -बंगलोर महामार्गावर अपघात : मुंबई वरुन कोल्हापूरला जाणाऱ्या कारचा भीषण अपघात तीन जण ठार

पुणे दिनांक २६ ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे ते बंगलोर राष्ट्रीय महामार्गवर बाॅम्बे रेस्टॉरंट चौका जवळ तवेरा कारला भीषण अपघात सकाळी झाल्याची घटना घडली आहे.नवी मुंबई वरुन जयसिंगपूरला निघालेल्या तवेरा कारचा रनिंग मध्ये अचानक पणे टायर फुटल्याने ही कार बोलेरो पिकअपला जोरदारपणे टक्कर दिल्यानंतर या अपघातात तवेरा गाडीतील तीन जणांचा घटना स्थळीच मृत्यू झाला आहे.
दरम्यान याप्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अपघात मध्ये ठार झालेल्या व्यक्तीचे नावे १) निखिल श्रीकांत सव्वाखंडे २) प्रियांका निखिल सव्वाखंडे ३) शशिकांत यदुनाथ सव्वाखंडे याप्रमाणे आहेत अपघातात अन्य चारजण गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.अपघातामधील सर्वजण हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर मधील रहिवासी आहेत.सदरचा अपघात एवढा भीषण होता की तवेरा गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.या अपघात प्रकरणी सातारा पोलीस स्टेशन मध्ये अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.