विमान एका झाडावर कोसळून अपघात : कॅनडामध्ये विमान कोसळून अपघातात तीन पायलटचा मृत्यू तर दोन भारतीय ट्रेनी पायलटचा समावेश दोघेजण मुंबईचे

पुणे दिनांक ७ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) कॅनडामध्ये विमान कोसळून अपघात झाला असून या विमान अपघातात दोन भारतीयांसह तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून स्थानिक प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहिती नुसार विमान हे एका झाडावर आदळल्या नंतर अपघात झाला झाला आहे.कॅनडामधील वॅंकूरजवळील चिल्लीवॅंक येथे हे विमान दुर्घटना ग्रस्त झाल्याची माहिती मिळत आहे.या दुर्घटना मध्ये दोन भारतीय ट्रेनी पायलट होते व अन्य एक ट्रेनी पायलट असा तिघांचा यात मृत्यू झाला आहे.दरम्यान सरावादरम्यान हे विमान एका झाडावर आदळल्या नंतर हा अपघात झाला आहे.
दरम्यान 🌲 झाडावर विमान आदळल्या नंतर ते हाॅटेल इमारतीच्या मागे कोसळले या दुर्दैवी दुर्घटनात दोन ट्रेनी भारतीय पायलट यांचा मृत्यू झाला असून त्यांची नावे.१) अभय गडरु २) यश विजय रामगुडे असे आहेत.दोन्ही ट्रेनी पायलट हे महाराष्ट्रातील असून ते मुंबई मधील रहिवासी आहेत.दरम्यान याप्रकरणी विमान दुर्घटना नंतर स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचले आहेत.यासंदर्भात अधीक तपास सुरू आहे.दरम्यान पायपर पीए- ३४ सेनेका हे डब्बल इंजिन असलेले हलके विमान चिली्लीवॅंक शहरातील मोटेलच्या येथे 🌲 झाडावर सरावादरम्यान कोसळून सदरचा अपघात झाला आहे.या विमान दुर्घटना मध्ये दोन ट्रेनी भारतीय पायलट सह अन्य एका पायलटचा मृत्यूचा समावेश असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.