Crimes : भरदिवसा पेरूगेट पोलीस चौकीच्या जवळ महाविद्यालयीन युवतीवर कोयत्याने हल्ला प्रकरणी चौकीचे तीन पोलीस कर्मचारी निलंबित.

पुणे.दिनांक २९.जुलै ( पोलखोल नामा ऑनलाईन न्यूज टीम ) शिक्षणांचे माहेरघर पुण्यात सदाशिव पेठेत पेरूगेट पोलीस चौकी जवळ काहीच अंतरावर भरदिवसा महाविद्यालयीन युवतीवर कोयत्याने हल्ला झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला होता. व संपूर्ण महाराष्ट्र हादरवून गेला होता. विश्रामबाग पोलीसांनी आरोपीस अटक केली असून. परंतू या हल्ल्याच्या वेळेस पोलीस चौकीत उपस्थित नव्हते. हल्ल्याच्या वेळी भयभीत झाल्यानंतर सदर युवतीने स्वतःला चौकीत कोंडून घेतले होते. आता या सर्व प्रकरणाचा तपास करून पोलीस उपायुक्त गिल यांनी त्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे.
दरम्यान पोलीस उपायुक्त संदिपसिंह गिल यांनी विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या पेरूगेट पोलीस चौकीचे हवालदार सह तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.या निलंबित पोलीस कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.याबाबतचे आदेश रात्री उशिरा जारी करण्यात आले आहेत. निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे. १) सुनिल शांताराम ताठे.पोलीस हवालदार. २) प्रशांत प्रकाश जगदाळे. पोलीस कर्मचारी. ३) सागर नामदेव राणे. पोलीस कर्मचारी. अशी आहेत. मंगळवारी अटक आरोपी शंतनू लक्ष्मण जाधव. यांने महाविद्यालयीन युवतीवर भरदिवसा कोयत्याने तिच्या डोक्यवर व हातावर वार करून तिला व अन्य एकाला जखमी केले होते सदरचा प्रकार हा पेरूगेट पोलीस चौकी जवळून काही अंतरावरच झाला होता. त्या वेळेस हे तिन्हीही पोलीस कर्मचारी गैरहजर होते. व हल्ला झालेल्या युवतीने भयभीत होऊन स्वतःला पेरूगेट पोलीस चौकीत कोंडून घेतले होते. त्यामुळे कर्तव्यात कसूर ठेवल्याचा ठपका त्यांच्या वर ठेवत त्या पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे.असे पोलीस उपायुक्त गिल यांनी माहीती दिली आहे. सदर आरोपीस पाच दिवसांची पोलीस कस्टडी न्यायालयाने दिली असून या प्रकरणाचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस करीत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.