केमिकल टँकरला धडकून वाहनं पेटली : पुणे ते सोलापूर महामार्गावर तीन वाहंने भीषण 🔥 आगीत जळून खाक

पुणे दिनांक २सप्टेंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे ते सोलापूर महामार्गावर दौंड तालुक्या जवळील सहजपूर गावा जवळ सोलापूर वरुन पुण्याला जाणाऱ्या तीन अवजड वाहनांना मध्येरात्री आग 🔥 लागल्याची मोठी घटना घडली आहे.त्यामुळे महामार्गावरील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे.या आगीत तीन अवजड वाहनं जळून खाक झाली आहे. आता घटना स्थळी पोलिस दाखल झाले असून वाहतूक व्यवस्था पूर्ववत करण्याचे काम सुरू केले आहे.
दरम्यान याप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार पुणे ते सोलापूर महामार्गावर दौंड तालुक्या जवळील सहजपूर येथे सोलापूर वरून पुण्याला जाणारा केमिकल टँकर थांबला होता.त्या टॅकरला पाठी मागून जोरात धडक दिल्याने सदरचा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.रात्रीच्या वेळेस दुर्घटना झाल्याने अग्निशमन यंत्रणा पोहोचली नाही.व आगीत तीन वाहनं जळून खाक झाली आहे.या महामार्गावर वाहनं जळत असल्या मुळे वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या असून पोलिसांच्या वतीने वाहतूक व्यवस्था पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे.व जळालेले अवजड वाहनांना साइडला घेण्याचे काम सुरू आहे.दरम्यान या घटनेत आगी व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.