Rahul Gandhi Threatened : इंदूरमध्ये राहुल गांधींना बॉम्बने उडवण्याची धमकी

भारत जोडो यात्रेचा आज ७२ वा दिवस आहे. ज्याची सुरुवात राहुल गांधी Rahul Gandhi यांनी महाराष्ट्रातील बाळापूरमधून केली आहे. महाराष्ट्रात जिथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्यावर टिप्पणी केल्याबद्दल पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे, तर दुसरीकडे मध्य प्रदेशात प्रवेश करण्यापूर्वी त्यांना बॉम्बची धमकी मिळाली आहे.
प्रत्यक्षात राहुल गांधींना बोम्बने Bomb उडवून Rahul Gandhi Threatened देण्याची धमकी देणारे पत्र इंदूरमध्ये मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या पत्रात राहुल गांधी 'भारत जोडो यात्रे'साठी इंदूरला पोहोचल्यावर त्यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे धमकीचे पत्र शुक्रवारी सकाळी म्हणजेच आज एका मिठाईच्या दुकानाबाहेरून मिळाले.
हे पत्र कोणी ठेवले आहे, हे कळू शकलेले नाही. मात्र गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी जवळच लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसची भारत जोडो यात्रा या दिवसात महाराष्ट्रात असली तरी ही यात्रा लवकरच मध्य प्रदेशात रवाना होणार आहे.
पूर्वी ही यात्रा 20 नोव्हेंबरला मध्य प्रदेशात पोहोचणार होती, मात्र आता ती 23 तारखेला पोहोचेल. अशा स्थितीत राहुल गांधींना Rahul Gandhi मध्य प्रदेशात येण्यापूर्वीच बॉम्बची धमकी मिळत आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.