Crime : भारती विध्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत भाईगिरी करण्यांवर एम.पी.डी.ए.कायद्या न्वये स्थानबध्देतेची कारवाई

पुणे दिनांक २६ ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) पुणे पोलिस आयुक्तालयातील भारती विध्यापीठ व सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत भाईगिरी करण्यावर आंबेगाव या ठिकाणी आपल्या इतर साथीदारांसह कोयता .लोंखडी हत्यारांच्या सहाय्याने खुनांचा पर्यंत्न करणे .जबर दुखापत करणे. गंभीर दुखापत करणे. दंगा. बेकायदा हत्यार बाळगने. या सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या भाईची पुणे शहर पोलिस आयुक्त पुणे रितेश कुमार यांनी एम.पी. डी.ए.कायद्या न्वये स्थानबध्देतेची एक वर्षा करिता अमरावती कारागृहात रवानगी केली आहे. आयुक्ताची ही ३३ वी कारवाई आहे.
अमरावती कारागृहात रवानगी केलेल्या भाईचे नाव चंद्रकांत रामदास माने ( वय २१ राहणार भेंडी चौक हरणाई काॅम्पलेक्स बिल्डींग मागे आंबेगाव खुर्द पुणे)असे आहे. यांच्या विरोधात भारती विध्यापीठ पोलिस स्टेशन मध्ये एकूण तीन गुन्हे दाखल आहेत. भारती विध्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार व पी.सी.बी.गुन्हे शाखा पुणे शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांनी या बाबतचा अहवाल सादर केला होता.
सदरच्या अहवाल व कागदपत्राची पडताळणी करून आरोपीची एम.पी.डी.ए.कायद्या न्वये अमरावती कारागृहात एक वर्षा करिता स्थानबध्द करण्याचे आदेश दिले आहेत. पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहरात दहशत निर्माण करण्यां-या सक्रिय व अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबले आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी कार्यभार स्विकारल्यानंतरची एम.पी .डी.ए.कायद्या न्वये स्थानबध्देतेची ३३ वी कारवाई आहे. या पुढे देखील सराईत व अट्टल गुन्हेगारांच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी व प्रति बंधक कारवाई करण्यात येणार आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.