आष्टी तालुक्यातील जत मधील घटना जमिनींचा वाद : बीड येथे आदिवासी महिलेला विवस्त्र करून मारहाण!' महिला आयोगाकडून अद्याप दखल नाही ' भाजप आमदारांच्या पत्नीसह तिघांवर गुन्हा दाखल

पुणे दिनांक २३ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात शरमेने मान खाली जाईल अशी एक घटना बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील जत येथे घडली आहे.एक आदिवासी महिला विवस्त्र अवस्थेत रस्त्यावर पळत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्याशी संबंधित असलेल्या लोकांनी रविवारी दिनांक १५ ऑक्टोबर रोजी आपल्यावर हल्ला केल्याचा खळबळ जणक आरोप पिडित महिलेने केला आहे.महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान याप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार.हा सर्व प्रकार जमिनीच्या वादातून झाला आहे.पिडित महिलाने सांगितले की त्यांची वडिलोपार्जित जमीन बळकावण्याच्या उद्देशाने भाजप आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस ह्या गुंडांच्या मदतीने प्रयत्न करत आहे.मी माझी सून घटने दिवशी चारा आणण्यासाठी शेतात गेले असताना त्यावेळी आरोपी राहुल पवार व रघु पवार हे तिथे आले व मला मारहाण केली.यावेळी पिडित महिलेने स्वतःचा बचाव करण्यांचा प्रयत्न केला.तेव्हा आरोपी यांनी तिला विवस्त्र केले.त्यानंतर ही महिला विवस्त्र पळत असताना कोणीतरी हा व्हिडिओ बनविला हा व्हिडिओ व्हायरल झाल्या नंतर पोलिसांनी पिडित महिलेच्या तक्रारीवरून भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस.राहुल जगदाळे व रघु पवार.या तिंघाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.या तिंघानवर अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर या पिडीत महिलेने केलेले सर्व आरोप धस यांनी फेटाळले आहेत.हे प्रकरण गंभीर असतांना महिला आयोगाने याची कोणतीही प्रकारची दखल अद्याप घेतलेली नाही.याचे विषेश वाटत आहे.हेच एखाद्या 'सेलिब्रेटी किंवा राजकीय ' प्ररकरण असते तर महिला आयोगाच्या वतीने लगेच दखल घेतली असती हे गरीब अनुसूचित जाती जमाती महिलाशी संबंधित आहे.व एका भाजप आमदारांच्या पत्नीवर या पिडीत महिलाने गंभीर असे आरोप केले आहेत.त्यामुळे राजकीय हस्तक्षेप या प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर आहे का.या संबंधित प्ररकणा नंतर अनेक संघटनांनी या पिडित महिलेच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले आहेत व या संपूर्ण प्रकरणांचा सखोल तपास करुन पिडित महिलेला न्याय मिळाला पाहिजे म्हणून पोलिस अधिकारी यांची भेट घेऊन त्यांना तसे निवेदन दिले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.